शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

पनवेलमधील रस्त्यांची दुरवस्था, खुले मॅनहोल ठरताहेत जीवघेणे; अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:49 IST

पनवेलमधील नागरिक सध्या खड्ड्यांमुळे त्रस्त असून, चालकांना याचा मोठा फटका बसत आहे. शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. अनेक ठिकाणी असलेले खुले मॅनहोल हे जीवघेणे ठरत

वैभव गायकर पनवेल : पनवेलमधील नागरिक सध्या खड्ड्यांमुळे त्रस्त असून, चालकांना याचा मोठा फटका बसत आहे. शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. अनेक ठिकाणी असलेले खुले मॅनहोल हे जीवघेणे ठरत असूनदेखील प्रशासनामार्फत योग्य त्या उपाययोजना राबविल्या जात नाहीत.पनवेलमधील गार्डन हॉटेल, नित्यानंद मार्ग अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र, प्रशासनामार्फत खड्डे बुजवण्याबाबत वेळकाढू भूमिका घेतली जात असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे पनवेलमधील नागरिकांना कमरेचे दुखणे, पाठीचे दुखणे, मणक्याचे दुखणे, अंगदुखी व रस्त्यावरील धुळीमुळे श्वसनाचे विकार जडलेले असून, नागरिक खड्ड्यांमुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत.पनवेलमधील जयभारत नाका-सावरकर चौक ते अमरधाम स्मशानभूमी रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. अपघाताची शक्यता वाढली आहे. नवीन पनवेलमधील शबरी हॉटेलजवळ अशाच प्रकारे मॅनहोलचे काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता अनेक दिवसांपासून या ठिकाणचा मार्ग बंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी भूमिगत विद्युतवाहिन्या टाकण्यासाठी वारंवार रस्त्याचे खोदकाम हाती घेतले जाते. पनवेल शहरात मध्यवर्ती ठिकाण म्हणून लोखंडी पाडा परिसरात जिल्हा सत्र न्यायालय काही महिन्यांपूर्वी सुरू झाले आहे. संपूर्ण जिल्हा, नवी मुंबई तसेच मुंबईमधून आलेले पक्षकार व वकील या ठिकाणी रोज येत असतात. मात्र, आजूबाजूला असलेल्या खड्डेमय रस्त्यांमुळे पनवेल प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या कामाबद्दल चिंता व्यक्त करीत आहेत.खुल्या मॅनहोलमुळे मोठी दुर्घटनारस्त्याचे काम करीत असताना अनेक वेळा मॅनहोलचे झाकण उघडून ते त्याच स्थितीत ठेवले जाते. रात्रीच्या वेळेला हे मॅनहोल वाहनचालकांना दिसत नसल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने अशाप्रकारे उघड्या स्थितीत मॅनहोल ठेवणाºया कंत्राटदारावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.