शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 07:11 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांकडून गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्याशिवाय घडलेल्या गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल जप्तीचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणात राज्यात नावाजल्या जाणा.....

- सूर्यकांत वाघमारनवी मुंबई : गतवर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांकडून गुन्हे प्रकटीकरणाच्या प्रमाणात घट झाली आहे. त्याशिवाय घडलेल्या गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल जप्तीचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे गुन्हे प्रकटीकरणात राज्यात नावाजल्या जाणाºया नवी मुंबई पोलिसांची कामगिरी मागील वर्षभरात ढिली पडल्याचे दिसून येत आहे. सोनसाखळी चोरी, वाहनचोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांचे प्रकटीकरण घटले असून, अशा गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेला मुद्देमाल जप्तीचेही प्रमाण कमी झाले आहे. शहरात सर्वाधिक गुन्हे वाहनचोरीचे आहेत. स्थानिक चोरट्यांसह शहराबाहेरील टोळ्या वाहनचोरीच्या गुन्ह्यात सक्रिय आहेत. अशा टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरीची वाहने जप्तीचे आव्हानच पोलिसांपुढे आहे. काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी कसोटीने गुन्हेगारांना अटक केलेली आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित अशी मुद्देमालाची जप्ती होऊ शकलेली नाही. गतवर्षी आयुक्तालय क्षेत्रातून आॅक्टोबर अखेरपर्यंत ५६९ वाहने चोरीला गेली होती. त्यापैकी २४७ गुन्हे उघड झाले असून, सुमारे ३१ टक्के मुद्देमालाची जप्ती झाली आहे, तर चालू वर्षात आॅक्टोबर अखेरपर्यंत ४९२ पैकी अवघे १४७ गुन्हे उघड झाले आहेत. त्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत मुद्देमाल जप्तीचे प्रमाण घटून अवघे २४ टक्के झाले आहे.सोनसाखळी चोरांनी संपूर्ण राज्यात डोके वर काढले असले, तरीही नवी मुंबईत मात्र हे गुन्हे काही प्रमाणात नियंत्रित झाले आहेत. सराईत टोळ्यांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण केलेला आहे. त्याशिवाय शहरातल्या प्रत्येक रस्त्यावरील सीसीटीव्हीमुळे पकडले जात असल्यानेही अनेकांनी गुन्ह्याचा मार्ग बदलला असावा. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात २१ ने घट झाली आहे. मंगळसूत्र हा महिलांचा भावनिकतेशी संबंधित असलेला दागिना असतो. त्यामुळे चोरीला गेलेले मंगळसूत्र परत मिळावे, अशी संबंधित महिलेला अपेक्षा असते. मात्र, जरी गुन्हे नियंत्रित केले असले, तरीही मुद्देमाल जप्तीचे प्रमाण चालू वर्षात २१ टक्क्यांनी घसरले आहे.दरोड्याच्या गुन्ह्यात मात्र पोलिसांनी अपेक्षित अशी कामगिरी दाखवली आहे. गतवर्षी ८ तर चालू वर्षात ५ घरफोडीचे गुन्हे घडले होते. दोन्ही वर्षांत हे सर्व गुन्हे उघडकीस करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर चोरीला गेलेला मुद्देमाल जप्तीत गतवर्षाच्या तुलनेत यंदा कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. चालू वर्षात आॅक्टोबरपर्यंत घरफोडीच्या ५ गुन्ह्यांत ७ कोटी ३१ लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यात गतमहिन्यातील बडोदा बँक लुटीच्या घटनेचा समावेश केल्यास तो ऐवज चालू वर्षात सुमारे दहा कोटींचा ऐवज लंपास झाला आहे. त्यापैकी आॅक्टोबरपर्यंतच्या गुन्ह्यातील ४ कोटी १५ लाखांचा ऐवज जप्त करून पोलिसांनी मुद्देमाल जप्तीचे प्रमाण ५७ टक्केपर्यंत नेले आहे; परंतु इतर गुन्ह्यांच्या मुद्देमाल जप्तीचे प्रमाण घटल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह व्यक्त होत आहे.आयुक्तांची नाराजीपोलिसांना गुन्हे उघड करण्यात व मुद्देमाल जप्तीमध्ये येत असलेल्या अपयशाचा अप्रत्यक्ष ठपका आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर उमटत आहे. त्यामुळेच आयुक्त हेमंत नगराळे यांनी नुकत्याच वाशीत झालेल्या कार्यक्रमात याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. तसेच सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास पथकांनी याचे गांभीर्य घेऊन त्यात सुधार करण्याचाही सल्ला दिला आहे.वाहनचोरीच्या सर्वाधिक घटना 

टॅग्स :Policeपोलिस