शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

कोकण रेल्वेच्या द्वि-साप्ताहिक विशेष गाड्यांचा जूनपर्यंत विस्तार

By कमलाकर कांबळे | Updated: March 25, 2024 20:52 IST

Konkan Railway News: विशेष बाब म्हणून होळीसाठी सुरू करण्यात आलेल्या नागपूर - मडगाव जंक्शन नागपूर या द्वि-साप्ताहिक विशेष गाड्यांची सेवा सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.

- कमलाकर कांबळे नवी मुंबई - विशेष बाब म्हणून होळीसाठी सुरू करण्यात आलेल्या नागपूर - मडगाव जंक्शन नागपूर या द्वि-साप्ताहिक विशेष गाड्यांची सेवा सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. यापूर्वी ही सेवा ३१ मार्चपर्यंत निर्धारित करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने या सेवेचा ९ जूनपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविल्या जातात. विशेषत: सणासुदीच्या दिवसांत विविध मार्गांवर अतिरिक्त गाड्या चालविल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून होळीसाठी विशेष बाब म्हणून नागपूर - मडगाव जंक्शन (०११३९) आणि मडगाव जंक्शन - नागपूर (०११४०) या द्वि - साप्ताहिक गाड्या चालविल्या जात आहेत. ३१ मार्चपर्यंत या गाड्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने जाहीर केला होता. परंतु, आता त्या ९ जूनपर्यंत चालविल्या जाणार आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार नागपूर - मडगाव जंक्शन ही गाडी ३ एप्रिल ते ८ जून या दरम्यान आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच बुधवार आणि शनिवारी धावणार आहे. तर मडगाव जंक्शन - नागपूर ही विशेष गाडी ४ एप्रिल ते ९ जून या कालावधीत पावसाचे दिवसवगळता प्रत्येक गुरुवार आणि रविवार असे आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.

पावसाळ्यातही विशेष गाड्याजून महिन्यात मान्सूनचे आगमन होते. त्यामुळे या काळातसुध्दा नागपूर - मडगाव जं. - नागपूर मार्गावर द्वि - साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. या गाड्या १२ जून ते ३० जून यादरम्यान धावणार आहेत. नागपूर - मडगाव जंक्शन (०११३९) ही द्वि-साप्ताहिक विशेष गाडी नागपूर येथून बुधवार आणि शनिवारी दुपारी ३:५ मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सांयकाळी ५:४५ वाजता मडगाव जंक्शनला पोहचेल. त्याचप्रमाणे मडगाव जंक्शन - नागपूर ( ०११४०) ही द्वि - साप्ताहिक गाडी १३ ते ३० जून या कालावधीत गुरुवार आणि रविवारी सांयकाळी ७:०० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल. ती दुसऱ्या दिवशी रात्री ९:३० वाजता नागपूरला पोहचेल. ही गाडी वर्धा जंक्शन, पुलगाव, धामणगाव, बडनेरा जंक्शन, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमाळी या स्थानकांवर थांबेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे