शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

घरांच्या अर्जांसाठी  सिडकोची मुदतवाढ? १,०६,००० ग्राहकांची ऑनलाइन नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 06:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या नोंदणीसाठी दिलेली मुदत ११ डिसेंबर रोजी संपत आहे.  आतापर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या नोंदणीसाठी दिलेली मुदत ११ डिसेंबर रोजी संपत आहे.  आतापर्यंत १ लाख ५ हजार ९४२ ग्राहकांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी केली आहे. अर्ज नोंदणीसाठी दोन दिवस शिल्लक आहेत. विशेष म्हणजे  सिडकोने घरांच्या किमतीही जाहीर केलेल्या नाहीत त्यामुळे अनेक ग्राहक संभ्रमात आहेत. ही बाब लक्षात घेऊन अर्ज नोंदणीसाठी सिडकोकडून आणखी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता सूत्राने व्यक्त केली आहे. 

सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध नोडमधील २७ ठिकाणी ६७ हजार घरे बांधली जात आहेत. पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची परवानगी मिळाली असून, त्यांचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. त्यातील २६ हजार घरांची योजना ११ ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची अखेरची मुदत ११ नोव्हेंबरपर्यंत होती. परंतु, दिवाळी आणि त्यानंतर निवडणुकीच्या धामधुमीमुळे अनेकांना ऑनलाइन अर्ज नोंदणी करता आली नाही. त्यामुळे सिडकोच्या संबंधित विभागाने अर्ज नोंदणीसाठी ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. ही मुदत बुधवारी संपत आहे. 

घरांच्या किमती जाहीर न केल्याने ग्राहक संभ्रमात आहेत. त्यामुळे अनेकांनी इच्छा असूनही ऑनलाइन अर्ज केलेला नाही. परिणामी अर्ज नोंदणीचा अपेक्षित आकडा सिडकोला गाठता आलेला नाही. या पार्श्वभूमीवर  या गृहयोजनेतील घरांच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी सिडकोकडून पुन्हा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता संबंधित विभागातील सूत्राने व्यक्त केली आहे. 

केवळ ३७,३९४ अर्जदारांनी भरले शुल्क विविध नोडमधील २६ हजार घरांची योजना सिडकोने जाहीर केली आहे. या योजनेतील घरांसाठी जवळपास दोन लाख अर्ज येतील, अशी सिडकोच्या संबंधित विभागाची अपेक्षा होती.  प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन महिन्यात १ लाख  ६ हजार ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. त्यापैकी फक्त ३७,३९४ ग्राहकांनी संबंधित प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले शुल्क अदा केले आहे.

टॅग्स :cidcoसिडको