शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

स्फोटाने हादरला ट्रक टर्मिनल परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:27 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील ट्रक टर्मिनल जवळील वाहतूकदाराच्या कार्यालयात बुधवारी रात्री केमिकलच्या ड्रमचा स्फोट झाला

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील ट्रक टर्मिनल जवळील वाहतूकदाराच्या कार्यालयात बुधवारी रात्री केमिकलच्या ड्रमचा स्फोट झाला. यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. २४ तासांनंतरही ड्रममध्ये कोणते केमिकल आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही. येथील ओमकार ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये व बाहेरील आवारामध्ये जवळपास १४ केमिकलचे ड्रम ठेवण्यात आले आहेत. बुधवारी रात्री येथे स्फोट झाला व केमिकलचा ड्रम उडून गाडीवर पडला. येथील कुस्तीच्या आखाड्याच्या छपरावरही ड्रमचे काही तुकडे पडले. स्फोटाच्या आवाजामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्फोटानंतर येथील नागरिकांच्या डोळ्याची आग होवू लागली.

उग्र वासही परिसरात पसरला होता. या परिसरामध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. स्फोटाचे वृत्त समजताच वाशी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. ड्रममध्ये कोणते केमिकल आहे याविषयी माहिती येथील ट्रान्सपोर्ट कंपनीमधील कोणाकडेही नाही. केमिकलचा मालकही घटनास्थळी आला नसल्याने गुरूवारी सायंकाळपर्यंत याविषयी तपशील उपलब्ध होवू शकला नाही. खबरदारी म्हणून अग्निशमन दलाने एक गाडी घटनास्थळी ठेवली आहे. घटनास्थळाकडे येण्यासाठी नागरिकांना मज्जाव केला आहे. ट्रक टर्मिनल परिसरातील ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या कंपनीमध्ये केमिकलचा साठा ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही. केमिकल हाताळण्याच्या सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. केमिकलचे ड्रम ठेवताना अपघात होवू नये यासाठी कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही. या प्रकरणी केमिकल हाताळणी नियमांचे उल्लंघन झाले आहे का याची चौकशी करण्यात यावी व जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

ट्रक टर्मिनलजवळ झालेल्या स्फोटानंतर या परिसराच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ट्रक टर्मिनल, एपीएमसी पोलीस स्टेशन परिसर व बाजार समितीच्या चारही बाजूला ट्रान्सपोर्ट कंपन्यांची कार्यालये व गोडावून आहेत. देशभरातून विविध प्रकारचा माल नवी मुंबईमध्ये आणला जातो व येथून तो देशाच्या इतर भागांमध्ये पाठविण्यात येत असतो. ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या कार्यालयात व गोडावूनमध्ये ठेवण्यात येणाºया मालाचा तपशील ठेवला जात नाही. केमिकलचा साठा या कार्यालयांमध्ये करता येत नाही. नियम धाब्यावर बसवून ज्वलनशील पदार्थांची साठवणूक केली जात असल्यामुळेच बुधवारचा स्फोट झाला आहे. याप्रकरणी पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.अग्निशमनची परवानगीही नाहीट्रान्सपोर्ट कंपन्यांची कार्यालये व गोडावूनमध्ये अग्निशमन नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. आग विझविण्यासाठीची काहीही उपाययोजना केलेली नसते. विशेष म्हणजे नियम तोडणाºयांवर अग्निशमन दलाचे अधिकारीही काहीही कारवाई करत नाहीत.अग्निशमनच्या दुर्लक्षामुळेच ज्वलनशील पदार्थांचा साठा केला जात असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.