शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल बसमध्ये आढळला विस्फोटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 10:34 IST

पनवेलमधील आपटे बस स्थानकावरील बसमध्ये बाँब सदृश्य वस्तू आढळून आली होती.

- वैभव गायकरपनवेल : पनवेलमधील आपटे बस स्थानकावरील बसमध्ये बाँब सदृश्य वस्तू आढळून आली होती. रात्री कर्जतवरून आपट्याला येणारी बस आपटे बस डेपोमध्ये थांबली असताना कंडक्टरला एका पिशवीत काही तरी टाईम बाँब सारखे असल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब बाँब शोधक पथकाला कळवले.रात्री 12 वाजण्याच्या सुमारास रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह अलिबाग वरून बाँब शोधक पथक घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत लोकांना याची माहिती मिळाली असल्याने सर्वांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी सर्वांना बसपासूनच दूर केले होते. आलेल्या बाँब शोधक पथकाने पाहणी केली असता ती वस्तू खरोखरच बाँब असल्याचे आढळून आले. रात्री उशिरापर्यंत बाँब निकामी करण्याचे काम सुरू झाले. शेवटी रात्री साडेतीनच्या सुमारास यशस्वीरीत्या बाँब निकामी केले गेले आणि त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.काही दिवसांपूर्वीच पुलवामा येथील दहशतवादी हल्ला झाला होता ज्यामध्ये ४४ भारतीय जवान शहीद झाले. अशातच ही घटना म्हणजे दहशतवाद्यांनी अनुचित प्रकार घडून आणण्यासाठी केलेले प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. सुदैवाने वेळीच याबाबत माहिती मिळाली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला, अन्यथा फार मोठे संकट उभे राहिले असते. पोलिसांनी याबाबत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून कोणतीही बेवारस वस्तू आढळून आल्यास हात न लावता त्याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन केले आहे.