शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल तालुक्यात डोंगर पोखरून सर्रास माती उत्खनन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 02:48 IST

पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र, हा विकास नैसर्गिक साधनसंपत्तीचा -हास करीत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी मातीचोरी होत असल्याचे दिसून येत आहे, तर काही ठिकाणी डोंगर पोखरून माती उत्खनन सुरू आहे.

- वैभव गायकरपनवेल  - पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र, हा विकास नैसर्गिक साधनसंपत्तीचा -हास करीत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी मातीचोरी होत असल्याचे दिसून येत आहे, तर काही ठिकाणी डोंगर पोखरून माती उत्खनन सुरू आहे. यावर कारवाईकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल वाया जात आहे.पनवेल तालुक्यात वनसंपदेबरोबरच डोंगररांगानी व्यापलेला परिसर मोठा आहे. विकासाच्या नावे अनेक मोठमोठे प्रकल्प, गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. या ठिकाणी सर्रास मातीचे उत्खनन सुरू आहे. सध्याच्या घडीला तालुक्यातील बेलवली, वारदोली, कर्नाळा या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने डोंगर पोखरून मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान करणे, दंडनीय अपराध असला तरी महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस माती उत्खननाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.सध्याच्या घडीला पनवेल तालुक्यात अनेक ठिकाणी असे प्रकार सर्रास सुरू असून, महसूल विभागामार्फत एकही ठिकाणी कारवाई केली जात नसल्याने परिसरातील नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.दररोज शेकडो डम्परांच्या साहाय्याने मातीचोरी केली जात आहे. मंडळ अधिकारी तसेच तलाठ्यांनी यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. शिवाय ज्या ठिकाणी मातीची रॉयल्टी भरली जाते, त्यामध्येही घोळ झालेला दिसतो. ज्या मिळकतीची रॉयल्टी घेतली जाते, त्या ठिकाणी मोजमाप केले जात नाही, यामुळे रॉयल्टी कमी आणि माती उत्खनन अधिक अशी स्थिती परिसरात दिसून येत आहे. यामुळे शासनाचा लाखो रु पयांचा महसूल पाण्यात जात आहे.पनवेल तालुक्यातील वारदोली या ठिकाणीही अनधिकृतपणे माती उत्खनन केले जात आहेत. या संदर्भात पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांनी पनवेल तहसील कार्यालयात लेखी तक्र ारही केलीआहे. मात्र, अद्याप दखल घेतली गेलेली नाही.रॉयल्टी कमी, उत्खनन अधिककाही ठिकाणी महसूल विभागाला रॉयल्टी अदा करून मातीचे उत्खनन केले जाते. मात्र, ज्या मिळकतीवरून माती उत्खनन केले जाते, त्या ठिकाणी मातीचे मोजमाप केले जात नाही, यामुळे शासनाची लाखोंची रॉयल्टी बुडते. नावापुरती किरकोळ रॉयल्टी भरून कितीतरी पट अधिक मातीचे उत्खनन अनेक ठिकाणी सर्रास सुरू आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई