शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे सामनेही सोडले नाहीत, सट्टेबाजांची विकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 08:50 IST

डी. वाय. पाटील मैदानातच केली अटक 

नवी मुंबई : नेरूळ येथे सुरू असलेल्या महिला क्रिकेट सामन्यावेळी सट्टा चालविणाऱ्या सहा जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडून २ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्टेडियममध्ये उपस्थित राहून मोबाइलवर सट्टा लावत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

नेरूळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर महिलांचे क्रिकेट सामने खेळले जात आहेत. त्यानुसार शनिवारी पहिलाच सामना गुजरात गिंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात होता. त्यासाठी स्टेडियममध्ये  पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला होता. 

यादरम्यान स्टेडियममध्ये काही जण मोबाइलवर सट्टा लावत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक माणिक नलावडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक उत्तम घेगडमल, गंगाधर देवडे, महेश पाटील, अनिल यादव, विष्णू पवार यांचे पथक केले होते. त्यांनी वेगवेगळ्या दोन ठिकाणी जमलेल्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मोबाइल तपासले. त्यामध्ये ते सामन्याच्या ऑनलाइन नोंदी ठेवत असल्याचे आढळून आले. 

हे आहेत सट्टेबाजअंकितकुमार हिंगड, सौरभ नराणीवाल, सुरेंद्रसिंग देवपूर, आयुशकुमार हिंगड, नितेश मेहता, पिंटुकुमार टेलर, हरचरणसिंग अरोरा व मनजीतसिंग अरोरा अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सामन्याचे तिकीट, सट्ट्यासाठी वापरलेले मोबाइल व दीड लाखाची रोकड असा एकूण २ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

आरोपी हरयाणा व राजस्थानचे अटक केलेले सर्व जण हरयाणा व राजस्थानचे आहेत. महिला क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावून सट्टा लावणाऱ्यांना सामन्यांची माहिती पुरवण्यासाठी ते नवी मुंबईत आले होते. त्यानुसार स्टेडियममध्ये उपस्थित राहून ते सट्टा लावत होते. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे पहिल्याच सामन्यात त्यांचीच विकेट पडली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई