शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

४० किलो स्फोटके टाकली तरी चिनाब पुलाला धोका नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 07:31 IST

Chenab Bridge: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उद्घाटन केलेला चिनाब नदीवरील पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही ३५ मीटर अधिक उंचीचा महाकाय पूल कोकण रेल्वे काॅर्पोरेशनने बांधला आहे.

- नारायण जाधवनवी मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी उद्घाटन केलेला चिनाब नदीवरील पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही ३५ मीटर अधिक उंचीचा महाकाय पूल कोकण रेल्वे काॅर्पोरेशनने बांधला आहे. तो बांधताना कोकण रेल्वेचे अधिकारी, तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांनी एकीकडे दहशतवादाचे सावट, तर दुसरीकडे नैसर्गिक  अडचणींचा सामना केला आहे. दहशतवादाचे सावट पाहून ४० किलो  स्फोटके टाकली तरी हा पूल सुरक्षित राहील, याची दक्षता घेतली आहे.

२००२-०३ सालापासून या पुलाच्या कामाला सुरुवात होऊन तो वेळेत पूर्ण होऊन उद्घाटनासाठी २०२५ चा जून महिन्याचा मुहूर्त साधावा लागला. कारण काम करताना भूगर्भातील हालचालींचे होत असलेले अडथळे, हवामानातील बदल आणि पुलाच्या पुनर्रचनेमुळे त्याचे बांधकाम पूर्ण होण्यास उशीर झाला.

हवामान, भूगर्भातील हालचालींसह भूकंपापासून कोणताही धोका या पुलाला होऊ नये यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातूनही अभ्यास करून कंत्राटदार कोकण रेल्वेच्या दीड ते दोन हजारांवर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून हा पूल बांधला. पुलाचे आकर्षण असलेल्या कमानीचा (आर्च) स्पॅन हा ४६७ मीटर आहे.  चिनाब नदीच्या पृष्ठभागापासून ३२० मीटर उंचीवर आणि १,३१५ मीटर लांबीच्या या नव्या स्टील आर्चवे पुलाचे काम २००४ मध्ये सुरू झाले होते. पुलाची मुख्य कमान ४६७ मीटर लांबीची असून, ती जगातील सर्वांत लांब कमानींपैकी एक आहे. त्यात १३.५ मीटर रुंदीचा डेक आहे, जो दोन रेल्वे ट्रॅकसाठी डिझाइन केला आहे. प्रकल्पाचे डिझायनिंग सल्लागार, डब्ल्यूएसपी फिनलंड यांनी टेकला स्ट्रक्चर्स सॉफ्टवेअरला निवडले होते.

१६ गावांमध्ये १२८ किलोमीटरचे रस्ते बोगदे आणि चिनाब पूल बांधण्यासाठी लागणारे साहित्य त्या भागांपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. तेथील रस्त्यांची दुरवस्था पाहता तिथपर्यंत साहित्य पोहोचणे अशक्य होते. हे लक्षात घेऊन कोकण रेल्वेने सर्वप्रथम १६ गावांमधून १२८ किलोमीटरचे रस्ते बांधले. धरमकुंड येथील जुनाट पुलावरून साहित्य नेणे कठीण असल्याने ४० टन वजन नेता येईल, अशा प्रकारचा नवीन पूलसुद्धा त्यांनी बांधला. 

भूकंप, वादळासह दहशतवाद्यांपासून धोका होणार नाही याची खबरदारी चिनाब पूल आणि बनविण्यात येत असलेले बोगदे यांना भूकंपापासून कोणताही धोका नाही. ही दोन्ही कामे सुरू असलेल्या कटरा आणि कौरी परिसरात भूकंपाचे छोटे धक्के काही प्रमाणात बसतात. त्याची दक्षता घेऊन येथील पूल आणि बोगदे बनल्यानंतर ते सुरक्षित राहतील, याची काळजी कोकण रेल्वेने घेतली आहे. 

शिवाय दहशतवाद्यांपासूनही कोणता धोका होऊ नये, यासाठीही खबरदारी घेतली आहे. ४० किलोग्रॅम स्फोटक जरी या पुलावर टाकले तरी त्याला फारसा धक्का न लागता यावरून ट्रेन धावू शकते, असे त्याचे डिझाइन आहे.

नॉर्वेस्थित फोर्स टेक्नॉलॉजी लॅबोरेटरीने वाऱ्याचा वेग त्याचे परिणाम समजून घेण्यासाठी चाचण्या घेतल्या. हा पूल २६० किमी/ताशी वेगाने येणाऱ्या वाऱ्याला तोंड देण्यासाठी डिझाइन केला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Railwayभारतीय रेल्वे