शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ईटीसी केंद्राला सर्वोत्कृष्ट संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 02:27 IST

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ई.टी.सी. अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा-सुविधा केंद्राला यामध्ये केंद्र शासनाचा २०१७मधील ‘सर्वोत्कृष्ट संस्था राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ई.टी.सी. अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा-सुविधा केंद्राला यामध्ये केंद्र शासनाचा २०१७मधील ‘सर्वोत्कृष्ट संस्था राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पंतप्रधान पुरस्काराप्रमाणेच अनेक राष्ट्रीय, राज्य पुरस्कारांनी नावाजले जाणारे ई.टी.सी. केंद्र. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ३ डिसेंबर २०१७ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून, नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर व आयुक्त या मानांकित राष्ट्रीय पुरस्काराचा स्वीकार करणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान पुरस्काराप्रमाणेच अनेक राष्ट्रीय, राज्य पुरस्कारांनी ई.टी.सी. केंद्राला सन्मानित करण्यात आले आहे.केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय स्तरावरील मानाचा सर्वोत्कृष्ट संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने लक्षणीय भर पडलेली आहे. १९६९पासून केंद्र सरकारकडून दिव्यांग व्यक्ती व त्यांच्यासाठी कार्य करणाºया संस्था यांना प्रेरणा देण्यासाठी असे पुरस्कार १४ विविध श्रेणींमध्ये वितरीत करण्यात येतात. यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणारी सर्वोत्कृष्ट संस्था, उत्कृष्ट दिव्यांग कर्मचारी, दिव्यांगांसाठीचे रोल मॉडेल, तसेच दिव्यांगांसाठी संशोधन करणाºया संस्था अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येत असतात. ई.टी.सी. केंद्राला मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेचा गौरव वाढविणारा असून, नवी मुंबईकर नागरिकांच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करीत ई.टी.सी. केंद्राच्या लोककल्याणकारी कामाची दखल लोकांप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावर केंद्र शासन पातळीवरही घेतली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई