शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

विकासाच्या नादात पर्यावरणाचा विनाश

By admin | Updated: July 2, 2017 06:33 IST

विकासाच्या नादात पर्यावरणाचा विनाश होत असून, उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित असल्याची खंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : विकासाच्या नादात पर्यावरणाचा विनाश होत असून, उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित असल्याची खंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यामुळे पर्यावरणपूरक जीवन जगण्याचा संकल्प करून, तीन वर्षांत ५० कोटी झाडे लावण्याचा निर्धार सरकारने केला असल्याचेही ते म्हणाले. वन विभागामार्फत राबवल्या जात असलेल्या राज्यस्तरीय वृक्ष लागवडीच्या महामोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते ऐरोली येथे उपस्थित होते.राज्यासह अनेक ठिकाणी सध्या पूरपरिस्थितीचा प्रसंग उद्भवत आहे; परंतु ही नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित आपत्ती असल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. शहरांचा विकास करण्याच्या नादात जल, जंगल व जमीन यांचा विनाश होत चालला असून, नद्यांचे रूपांतर नाल्यात झाले आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन वन विभागामार्फत तीन वर्षांत राज्यात ५० कोटी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. गतवर्षी या मोहिमेला सुरुवात झाली असून, यंदा ४ कोटी झाडे लावली जाणार आहेत. त्याकरिता १ ते ७ जुलै दरम्यान राज्यात वृक्ष लागवडीची महामोहीम राबवली जात आहे. त्याचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी ऐरोली येथील जैव विविधता केंद्रालगत करण्यात आला. या वेळी खाडीकिनारच्या मोकळ्या जागेत सुमारे १८०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. राज्यात तीन वर्षांत एकूण ५० कोटी झाडे लावली जाणार असून, प्रत्येक झाड लावल्यानंतर जिओ टॅगिंगद्वारे त्यावर लक्ष ठेवले जात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत पाण्याचे स्रोत पुनरुजीवित करण्याचे काम सुरू असून, गाळमुक्त नदी, शिवार हे नवे धोरण राबवले जाणार असून, पर्यावरणपूरक जीवन जगण्याचा सरकारचा संकल्प असल्याचेही ते म्हणाले. या वेळी ईशा फाउंडेशनचे प्रमुख सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या देशभर सुरू असलेल्या नदीबचाव कार्याची प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच राज्यात ही मोहीम राबवण्याकरिता सरकार त्यांच्यासोबत असल्याचे आश्वासन दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आगामी काळात पर्यावरणपूरक इंधनावर चालणाऱ्या वाहनांवर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. त्याची प्राथमिक सुरुवात नागपूरमध्ये बायो इंधनवर चालणाऱ्या ५५ बस सुरू करून केल्याचेही त्यांनी नमूद केले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात २० टक्केपेक्षा कमी हरित क्षेत्र असून, वृक्षारोपण महामोहिमेतून हे प्रमाण ३३ टक्क््यांपर्यंत करणार असल्याचा निर्धार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास राज्यमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम, पालकमंत्री एकनाथ शिंदे, सद्गुरू जग्गी वासुदेव, महापौर सुधाकर सोनवणे, आमदार मंदा म्हात्रे आदी उपस्थित होते.संत तुकाराम वनग्राम पुरस्काराचे प्रदानवन संरक्षणाला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने राज्यात संत तुकाराम वनग्राम पुरस्कार दिला जातो. यानुसार २०१५चा हा पुरस्कार नागपूरमधील सोनापूर गावातील संयुक्त वन समितीला प्रदान करण्यात आला. दहा लाख रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्याशिवाय चंद्रपूरमधील पवनपार, लातूरमधील लांबोटा, नांदेडमधील बेंभरगाव, गोंदियामधील नवाटोळा व हिंगोलीमधील अंजनवाडा या गावांनाही द्वितीय व तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.वन्यजीव सुरक्षा वाहनजंगलातील पशू-पक्ष्यांवर उपचार करता यावेत, त्यांना सुरक्षा मिळावी, याकरिता वन विभागातर्फे वन्यजीव सुरक्षा वाहन तयार करण्यात आले आहे. अशाप्रकारचे वाहन राज्यात प्रथमच वापरले जाणार असून, त्याद्वारे जखमी वन्यजीवांना वेळीच उपचार मिळणार आहेत. सद्यस्थितीला हे वाहन बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असणार आहे. मोटारसायकल रॅलीवृक्षारोपणाचा संदेश देण्यासाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. वृक्षारोपण सप्ताहाच्या सात दिवसांच्या कालावधीत ते ऐरोली ते नाशिक, अमरावती, बीड, अहमदनगर, पुणे व ठाणे असा सुमारे दोन हजार किलो मीटरचा प्रवास करणार आहेत.