शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संचालकांनी ठाणे जिल्ह्यातील पाच पाणथळींचे अस्तित्व केले अमान्य?

By नारायण जाधव | Updated: February 28, 2024 17:51 IST

केंद्राने सूचित केलेल्या सहा पाणथळींच्या क्षेत्रांमध्ये ठाणे तालुक्यातील ज्वेल ऑफ नवी मुंबई, मीरा-भाईंदरच्या उत्तन येथील मागाली तलाव, कल्याणचा उटणे आणि निळजे तलाव, भिवंडीतील वडपे आणि वऱ्हाळा तलाव यांचा समावेश आहे.

नवी मुंबई : देशातील २.२५ हेक्टरपेक्षा जास्त आकाराच्या दोन लाख एक हजार पाणथळींचे संरक्षण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सक्त आदेश असताना त्याना अव्हेरून महाराष्ट्र राज्य पर्यावरण आणि हवामान नियंत्रण विभागाच्या संचालकांनी नवी मुंबईतील पाम बीच रोडवरील एका पाणथळीच्या संरक्षणाबाबत संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नवी मुंबईतील ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ ही एकमेव पाणथळीचे क्षेत्र असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. पर्यावरण आणि हवामान नियंत्रण विभागाच्या संचालकांचा हा दावा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचित केलेल्या जिल्हाभरातील पाणथळींचे अस्तित्व अमान्य करणारा असल्याचे सांगून याबाबत पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठाणे जिल्हाधिकारी यांनी पर्यावरण संचालकांना २० जून २०२२ रोजी लिहिलेल्या पत्रानुसार, ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने सूचित केलेल्या पाणथळींची संख्या १३२ असून, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सूचित केलेल्या पाणथळींची संख्या ६ आणि अधिसूचित न केलेल्या पाणथळींची संख्या १२१ इतकी आहे.

केंद्राने सूचित सहा पाणथळी

केंद्राने सूचित केलेल्या सहा पाणथळींच्या क्षेत्रांमध्ये ठाणे तालुक्यातील ज्वेल ऑफ नवी मुंबई, मीरा-भाईंदरच्या उत्तन येथील मागाली तलाव, कल्याणचा उटणे आणि निळजे तलाव, भिवंडीतील वडपे आणि वऱ्हाळा तलाव यांचा समावेश आहे.

पर्यावरण संचालकांचा दावा दिशाभूल करणारा

नवी मुंबईतील नेरूळ येथील लोटस तलावाबाबत दाखल केलेल्या याचिकेवर पर्यावरण संचालकांनी ठाणे जिल्ह्यात ज्वेल ऑफ नवी मुंबई ही एकमेव पाणथळ क्षेत्र असल्याचे म्हटले आहे. त्यांचा हा दावा पूर्णत: न्यायालयाची दिशाभूल करणारा असल्याचे नवी मुंबईतील पाच बीच रोडवरील २० हेक्टर एनआरआय पाणथळ आणि १३ हेक्टर टीएस चाणक्य पाणथळींसाठी लढा उभारणारे पर्यावरणप्रेमी सुनील अगरवाल आणि श्रुती अगरवाल यांनी म्हटले आहे. आमच्या लढ्यामुळेच आज नवी मुंबईत येणाऱ्या फ्लेमिंगोंची संख्या वाढली आहे, असे ते म्हणाले.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सूचित केलेल्या सहा पाणथळींची माहिती २०१७ मध्येच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यानंतर ठाणे खाडी परिसराला जागितक दर्जाच्या रामसर क्षेत्राचा दर्जा दिलेला आहे. याचा कोणताही उल्लेख पर्यावरण संचालकांनी आपल्या प्रतिज्ञा पत्रात केलेला नाही. हे अतिशय धक्कादायक आहे. कमीत कमी त्यांनी या सर्वांचा उल्लेख तरी त्यात करायला हवा होता. पर्यावरण विभागाच्या अशा धोरणांमुळेच नवी मुंबई, रायगडसह ठाणे जिल्ह्यातील पाणथळी नष्ट हाेत चालल्या आहेत. त्यांचे हे बिल्डरधार्जिणे धोरण मानवजातीला एक दिवस खूप महागात पडेल.-सुनील अगरवाल, पर्यावरणप्रेमी, नवी मुंबई

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई