शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

तळोजामधील उद्योजकांना हवे पनवेल विभागीय कार्यालय, महापेमधील कार्यालय गैरसोयीचे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 10:06 AM

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये १६२२ युनिट सुरू आहेत. येथील उद्योजकांना भूखंड खरेदी-विक्री, भाडेकरार, कर्जतारण व इतर कामे करण्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये जावे लागते.

नामदेव मोरे -नवी मुंबई : एमआयडीसीचे पनवेलमध्ये विभागीय कार्यालय असताना तळोजा औद्योगिक वसाहतीचे कामकाज महापे विभागीय कार्यालयामधून सुरू आहे. यामुळे उद्योजकांचा प्रवासासाठी जास्त वेळ जात आहे. शिवाय महापे कार्यालयामध्ये नवी मुंबई एमआयडीसीचा ताण जास्त असल्यामुळे कामेही वेळेत होत नाहीत. यामुळे तळोजा पनवेल कार्यालयाशी जोडावे, अशी मागणी टीआयए संघटनेने केली आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये १६२२ युनिट सुरू आहेत. येथील उद्योजकांना भूखंड खरेदी-विक्री, भाडेकरार, कर्जतारण व इतर कामे करण्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये जावे लागते. एमआयडीसीचे खांदा कॉलनीमध्ये विभागीय कार्यालय आहे. तळोजापासून ९ किलोमीटर अंतरावरील कार्यालय उद्योजकांच्या सोयीचे आहे; परंतु शासनाने तळोजा महापे कार्यालयाशी जोडले आहे. यामुळे उद्योजकांना २५ किलोमीटरचा प्रवास करून महापेला जावे लागते. वास्तविक महापे कार्यालयात ठाणे, बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील ५५०४ युनिट, तळोजाचे १६२२, पातळगंगाचे १०६ व विस्तारित पातळगंगाचे ५२७ युनिट असे एकूण ७७५८ उद्योगांशी संबंधित काम चालत आहे. यामुळे कार्यालयीन कामे वेळेत होत नाहीत. उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांना पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे कामे वेळेत होत नाहीत व उद्योजकांना वारंवार कार्यालयात यावे लागत आहे.पनवेल विभागीय कार्यालयांमधून महाड, अतिरिक्त महाड, रोहा, बागड, औसार, नागोठणे एमआयडीसीमधील १८०७ उद्योगांचे काम चालत आहे. याठिकाणी कामाचा ताण कमी आहे. यामुळे तळोजाला पनवेल विभागाशी जोडल्यास महापे कार्यालयावरील ताण कमी होईल व कामे वेळेत होतील. उद्योजकांना महापेपर्यंत जाण्यासाठीचा वेळ वाचेल व महत्त्वाच्या कामांची रखडपट्टी थांबणार आहे. तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने यासाठी पाठपुरावा केला आहे. एमआयडीसी प्रशासन व शासनाकडेही पाठपुरावा सुरू केला आहे. 

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना ना हरकत प्रमाणपत्र, कर्ज तारण व भूखंडाशी सर्व व्यवहारांसाठी एमआयडीसीच्या महापे कार्यालयात जावे लागते. महापेऐवजी पनवेल कार्यालयाशी जाेडले जावे, अशी मागणी आम्ही केली आहे. यामुळे कामे अधिक वेगाने होतील.- सतीश शेट्टी, अध्यक्ष, तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन

महापे विभागीय कार्यालयअंतर्गत एमआयडीसीचा तपशीलएमआयडीसी     उद्योगठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत    ५५०३तळोजा     १६२२पातळगंगा     १०६अतिरिक्त पातळगंगा     ५२६

पनवेल विभागीय अंतर्गत एमआयडी -एमआयडीसी    उद्योगमहाड     ७७१अतिरिक्त महाड     २०७रोहा     १७२विले भागड     ६४९नागठाणे     ६उसर     २ 

टॅग्स :businessव्यवसायNavi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका