शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

किनारपट्टीवर लवकरच लुटा हाउसबोटींचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 09:03 IST

मेरीटाइम बोर्डाचा पुढाकार : बंदर विकासाबरोबरच स्थानिकांची उन्नती

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्याच्या ७२० किमीच्या समुद्रकिनारपट्टीवर लवकरच बंदर विकासासह विविध उद्योगांची उभारणी दिसणार असून, त्यांच्या विकासासाठी जलवाहतूक, रो-रो सेवा आणि फ्लोटेल्स, हाउसबोट्स, सीप्लेन, पाण्यावर धावणाऱ्या बसचा आनंद लुटता येणार आहे. याशिवाय पर्यटकांना समुद्र भ्रमणासह मनोरंजनासाठी मासेमारी करता येणार आहे. महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाने यासाठी पुढाकार घेतला आहे.

महाराष्ट्रातील किनारपट्टीवर उपरोक्त क्षेत्रात सेवा देण्यासाठी जे इच्छुक आहेत, अशा उद्योजकांकडून मेरी टाइम बोर्डाने ११ जानेवारी २०२४ पर्यंत स्वारस्य देकार मागविले आहेत.महाराष्ट्राला ७२० किलोमीटरची समुद्रकिनारपट्टी लाभलेली आहे. यामुळे राज्यात सागरी विकासाची प्रचंड क्षमता आहे. आजघडीला राज्यात दोन प्रमुख बंदरांसह ४८ छोटी बंदरे आहेत. यामुळे येथील सागरी संसाधनांचा लाभ उठवून राज्याच्या आर्थिक वृद्धीसाठी राज्य शासनाने हे उद्योग सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यातून नोकऱ्या निर्माण करण्याबरोबरच किनारपट्टीचा विस्तार हा केवळ पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक करण्यासाठीच न करता त्या भागातील नागरिकांची सामाजिक-आर्थिक प्रगती साधणे हा उद्देश हे उद्योग सुरू करण्यामागे आहे.

बेलापूर जेट्टीवरून पर्यटकांची ने-आणनवी मुंबईतील नियोजित ‘फ्लोटेल’वर पर्यटकांची ने-आण बेलापूर जेट्टीवरून केली जाणार आहे. या जेट्टीचा वापर लवकरच मुंबई-नवी मुंबईसह ठाणे-कल्याण-मीरा-भाईंदर-वसईपर्यंतच्या जलवाहतुकीसाठीही होणार आहे. यामुळे महामुंबईतील पर्यटकांना नवी मुंबईतील या ‘फ्लोटेल’चा लाभ घेणे सोपे हाेणार आहे. 

नवी मुंबईतही उभारणार फ्लोटेल सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी नवी मुंबईत हे ‘फ्लोटेल’ उभारले जाणार आहे. गेल्यावर्षीच यासाठी निविदा मागविल्या होत्या. कारण या परिसरात लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ आकार घेत आहे. सी लिंकच्या उभारणीमुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई शहर एकदम जवळ येणार आहे. याच परिसरात जगप्रसिद्ध घारापुरी लेणींसह बेलापूर किल्ला, जेएनपीटी, गेटवे ऑफ इंडिया, रेवस मार्गे अलिबाग जोडले जाणार आहेत. यामुळे ‘फ्लोटेल’ उभारण्यासाठी नवी मुंबईतील बेलापूर-उलवे खाडीची निवड केली आहे.

हे उद्योग सुरू करणारयात प्रामुख्याने कॅप्टिव्ह जेट्टी, शिपयार्ड, जहाज दुरुस्ती, जहाजांचा पुनर्वापर, मरिना विकसित करणे, रो-रो / रो-पॅक्स फेरी सेवा सुरू करणे, कोस्टल शिपिंगला चालना देणे, बंदराच्या विकासासाठी आवश्यक अशा औद्योगिकीकरण वाढविण्यासह जलवाहतूक, फ्लोटेल्स, हाउसबोट्स, सीप्लेन, पाण्यावर धावणाऱ्या बस सुरू हाेतील. याशिवाय पर्यटकांना समुद्र भ्रमणासह मनोरंजनासाठी मासेमारीचा आनंद घेता येणार आहे.