शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या पहिल्याच दिवशी आयुष्याचा शेवट; कोपरखैरणेतील हत्येचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 05:14 IST

गर्दुल्ल्यांनी पैसे लुटण्यासाठी गयासागर मिश्रा (२३) या टॅक्सीचालकाची हत्या केल्याची घटना कोपरखैरणेत घडली आहे.

नवी मुंबई : टॅक्सीत प्रवासी म्हणून बसलेल्या दोघांनी चालकाला लुटण्याच्या प्रयत्नात त्याची हत्या केल्याची घटना कोपरखैरणेत घडली होती. त्यामध्ये मयत चालकाचा तो नोकरीचा पहिलाच दिवस होता असे समोर आले आहे. गोठीवली येथील नातेवाइकांकडे आश्रय मिळवल्यानंतर तो ओलाच्या टॅक्सीवर चालक म्हणून कामाला लागला होता.गर्दुल्ल्यांनी पैसे लुटण्यासाठी गयासागर मिश्रा (२३) या टॅक्सीचालकाची हत्या केल्याची घटना कोपरखैरणेत घडली आहे. गयासागर मिश्रा याचा तो नोकरीचा पहिलाच दिवस होता, तो मूळचा मध्यप्रदेशचा राहणारा असून नोकरीसाठी नवी मुंबईत आला होता. त्यानुसार गोठीवली येथे राहणाऱ्या मामाकडे त्याने आश्रय मिळवला होता. त्यानंतर ओलाच्या टॅक्सीवर चालकाची नोकरी मिळवली होती.नोकरीच्या पहिल्याच दिवशी रात्रपाळीवर असताना प्रवासी म्हणून बसलेल्या दोघांनी त्याची हत्या केली. त्याच्या हत्येप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी पकडलेले आकाश नवघने व किरण चिकणे हे दोघेही अमली पदार्थ विक्रीत सक्रिय आहेत. हे दोघे सेक्टर ४ येथील आदर्श बार समोरून मिश्रा याच्या टॅक्सीत प्रवासी म्हणून बसले.यानंतर त्यांनी सर्व्हिस रोडने गाडी नेण्यास सांगून अवघ्या ३०० मीटर अंतरावर एकांताच्या ठिकाणी त्याची हत्या करून मोबाइल व पैसे लुटून पळ काढला. ज्या ठिकाणी ही घटना घडली तो परिसर रात्रीच्या वेळी गुन्हेगारी टोळक्यांचा अड्डा बनत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याकरिता महावितरणच्या उघड्या ट्रान्सफार्मर रूम, आडोशाच्या जागा तसेच मोकळी मैदाने वापरली जात आहेत, त्यामुळे नागरिकांनाही रात्रीच्या वेळी प्रवास करताना जीव मुठीत धरून घराबाहेर निघावे लागत आहे.

टॅग्स :Murderखून