शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सानपाडा रेल्वे स्टेशनच्या प्रसाधनगृहामध्ये अतिक्रमण

By admin | Updated: July 29, 2016 02:31 IST

सानपाडा रेल्वे स्टेशन इमारतीच्या तळमजल्यावरील सार्वजनिक प्रसाधनगृहाची भिंत तोडून हॉटेल व्यावसायिकाने स्वतंत्र दरवाजा बसविला आहे. गोडावूनप्रमाणे या जागेचा वापर सुरू आहे.

नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्टेशन इमारतीच्या तळमजल्यावरील सार्वजनिक प्रसाधनगृहाची भिंत तोडून हॉटेल व्यावसायिकाने स्वतंत्र दरवाजा बसविला आहे. गोडावूनप्रमाणे या जागेचा वापर सुरू आहे. पहिल्या मजल्यावर जीमच्या व्यवस्थापनाने प्रसाधनगृहाची तोडफोड करून त्यामध्ये अतिक्रमण केले असून तक्रारी करूनही सिडको प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. सानपाडा रेल्वे स्टेशन इमारतीला समस्यांचा विळखा पडू लागला आहे. महापालिकेने सील केलेल्या गाळ्यांचे कुलूप विनापरवाना उघडल्याचे प्रकरण ताजे असताना येथील दोन व्यावसायिकांनी सार्वजनिक वापराच्या प्रसाधनगृहामध्येच अतिक्रमण केले आहे. पश्चिम बाजूला प्रत्येक मजल्यावर गाळेधारकांसाठी सार्वजनिक प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले आहे. पहिल्या मजल्यावर जीम सुरू केली आहे. जीममध्ये येणाऱ्यांसाठी स्वतंत्र वॉशरूम आवश्यक असल्याने येथील व्यवस्थापनाने तीन महिन्यांपूर्वी कोणालाही विश्वासात न घेता सार्वजनिक प्रसाधनगृहाची तोडफोड करून त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. तोडफोड केल्यानंतर आवश्यक दुरूस्तीची कामे केली नाहीत. यामुळे या मजल्यावर प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे. सिडको प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्यांनी अद्याप काहीच कारवाई केली नाही. याच विंगमध्ये तळमजल्यावर रसोई रेस्टॉरंट व बार आहे. बारमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र वॉशरूम असावे यासाठी हॉटेल व्यावसायिकाने भिंत तोडून स्वतंत्र दरवाजा तयार केला आहे. पुरूष व महिलांसाठी पूर्वी स्वतंत्र प्रसाधनगृह होते. परंतु येथील महिलांसाठीचे प्रसाधनगृह बंदच केले आहे. सर्व गाळ्यांमधील कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी असलेल्या प्रसाधनगृहांवर दोन व्यावसायिकांनी अतिक्रमण करून सिडको प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने नाराजी व्यक्त केली. सिडकोच्या अधिकाऱ्यांचेच अभय या दोन व्यावसायिकांच्या अतिक्रमणास असल्याचा आरोप होत आहे.