शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नैना क्षेत्रातील अतिक्रमणांचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 01:14 IST

सिडकोच्या नैना क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत. त्याला प्रतिबंध घालण्यात सिडको प्रशासनाला अपयश आले आहे.

नवी मुंबई : सिडकोच्या नैना क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभारली जात आहेत. त्याला प्रतिबंध घालण्यात सिडको प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील संभाव्य विकासाला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बेकायदा बांधकामांना आळा घालावा,अशी मागणी विकासकांकडून होते आहे.नैना क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने सिडकोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार सिडकोने तयार केलेल्या २३ गावांचा पथदर्शी प्रकल्पाच्या विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच दुसºया टप्प्यातील विकास आराखडाही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. एकूणच पुढील वीस वर्षांत नैना क्षेत्राचा विकास करण्याचे सिडकोचे धोरण आहे. असे असले तरी या परिसरात उभारल्या जाणाºया अनधिकृत बांधकामांचा या विकास प्रक्रियेला अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे नैना क्षेत्रातील विकासकामांसंदर्भात सिडकोने आखून दिलेल्या नियमावलीला अनेक विकासकांचा विरोध आहे. त्यात सुधारणा करण्याची मागणी विकासक संघटनांकडून केली जात आहे. याचा परिणाम म्हणून विकास आराखड्याला मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. याचा फायदा भूमाफियांनी घेतला आहे. बिनदिक्कतपणे बेकायदा इमारती उभारल्या जात आहेत. या बांधकामांना प्रतिबंध घालण्यात सिडकोच्या संबंधित विभागासमोर मर्यादा पडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात बेकायदा बांधकामांचा प्रश्न नैनाच्या विकासात मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यावर आताच प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे असून सिडकोने सर्वप्रथम या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना आळा घालावा, अशी मागणी विकासकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :cidcoसिडको