शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

‘अतिक्रमणमुक्त शहर’ला हरताळ?

By admin | Updated: September 11, 2016 02:39 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार फेरीवाले, मार्जिनल स्पेस, विनापरवाना होर्डिंग्ज

कमलाकर कांबळे,  नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार फेरीवाले, मार्जिनल स्पेस, विनापरवाना होर्डिंग्ज, बेकायदा बांधकामे आदींना प्रतिबंध घालण्याचे निर्देश संबधित विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. परंतु विभाग कार्यालयाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याने आयुक्तांच्या या संकल्पनेला अप्रत्यक्षपणे हरताळ फासला असल्याचे दिसून आले आहे.मागील दीड दशकात शहरात मोठ्याप्रमाणात बेकायदा बांधकामे उभारली गेली आहेत. पदपथांवर फेरीवाल्यांना कब्जा केला आहे. व्यापाऱ्यांनी मार्जिनल स्पेसच्या जागा बळकावल्या आहेत. विनापरवाना होर्डिंगची बजबजपुरी झाली आहे. एकूणच सुनियोजित शहर म्हणून टेंभा मिरविणाऱ्या नवी मुंबईचा चेहरामोहरा पुरता बदलून गेला आहे. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी सर्वप्रथम या अनधिकृत प्रकाराला आळा घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्यात पदपथांवरील फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. विनापरवाना होर्डिंगबाजीला प्रतिबंध घातला. मार्जिनल स्पेसच्या जागा रिकाम्या केल्या. त्यांच्या या धडक कारवाईमुळे काही घटकांत नाराजीचे सूर पसरले असले तरी शहरवासियांकडून मात्र त्यांचे चांगलेच कौतुक झाले. विशेष म्हणजे ही मोहिमेत खंड पडू नये, यासाठी विभाग अधिकाऱ्यांना निर्देश देणयात आले. परंतु राजकीय दडपणाखाली काम करण्याची सवय लागलेल्या बहुतांशी विभाग अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला सोयिस्कररित्या बगल दिल्याचे पाहवयास मिळत आहे. याचा परिणाम म्हणून कारवाई करण्यात आलेल्या अनेक भागात फेरीवाल्यांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे. व्यापाऱ्यांनी दुकानांसमोरील मार्जिनल स्पेसवर हळूहळू पाय पसरायला सुरूवात केली आहे. बेकायदा बांधकामांचा धडाका सुरूच आहे.जुहूगाव, कोपरखैरणे, कोपरी, घणसोली, गोठीवली तसेच सानपाडा, नेरूळ आदी गाव गावठाणांत आजही मोठ्याप्रमाणात फिफ्टी-फिफ्टीची बांधकामे सुरू आहेत. बैठ्या घरांचे विनापरवाना वाढीव बांधकाम बिनदिक्कत सुरू आहे. कोपरखैरणे विभागात तर अशा बांधकामांनी कळस गाठला आहे. परवानगी एका मजल्याची आणि बांधकाम तीन मजल्यापर्यंत असा जुना फंडा आजही या परिसरात सर्रास सुरू आहे. कोपरीगावात पामबीच मार्गालगतच्या मोकळ्या जागांवर जुन्या वाहन विक्रींचा कार बाजार बिनदिक्कतपणे सुरू आहे. सध्या गणेशोत्सवाचे दिवस आहेत. या उत्सवाच्या आडून बेकायदा बांधकामांचा धडका सुरू असून यासंदर्भात संबधित प्रशासनाने अर्थपूर्ण चुप्पी साधल्याचे दिसून येते.