शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भिकाऱ्यांचे महामार्गावर अतिक्रमण, सानपाड्यामध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 23:32 IST

सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा येथे ५०० पेक्षा जास्त भिका-यांनी अतिक्रमण केले आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा येथे ५०० पेक्षा जास्त भिका-यांनी अतिक्रमण केले आहे. मुख्य रोडवरही मोठ्या संख्येने अनेक जण बसलेले असतात, अशीच स्थिती राहिली तर अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सानपाडा उड्डाणपुलाखाली अनेक महिन्यांपासून भिकाºयांनी वास्तव्य केले आहे. महापालिका व पोलीस काहीच कारवाई करत नसल्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ५०० पेक्षा जास्त भिकारी पुलाखाली व बाजूच्या पदपथावर वास्तव्य करत आहेत. अनेक जण महामार्गावर रोडवरच घोळका करून थांबू लागले आहेत. पदपथ व मुख्य रोडवर बसलेल्या या नागरिकांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. एखाद्या वाहनचालकाचा ताबा सुटला, तर एकाच वेळी ४० ते ५० नागरिक चिरडले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाहनचालकांनी या विषयी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अपघात झाल्यास चालकांना दोषी धरले जाण्याची शक्यता आहे, यामुळे वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस स्टेशनसह महानगरपालिकेने अतिक्रमण करणाºयांना येथून हाकलावे, अशी मागणी चालकांसह नागरिकांनी केली आहे.भिकाºयांच्या वाढत्या संख्येमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहेच, याशिवाय या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी भीक न दिल्यामुळे २० ते २५ भिकाºयांनी एका दुकानावर दगड मारण्याचा प्रयत्न केला होता. या परिसरातील सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. एका गृहनिर्माण सोसायटीमधील मंदिराची दानपेटीही चोरीला गेली होती. परिसरात दुर्गंधी पसरू लागली असून, साथीचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील भाजपाचे पदाधिकारी राजेश राय यांनी अनेक वेळा महापालिकेकडे याविषयी तक्रार केली आहे.>महामार्गावर भिकारी बसू लागल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.५०० पेक्षा जास्त भिकाºयांमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.परिसरामध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे.भिकाºयांचा उपद्रव येथून ये-जा करणाºयांना होऊ लागला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.