शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्मितीवर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 1:19 AM

आयुक्तांचे निर्देश : पोलीस अधिकाऱ्यांसह मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक

नवी मुंबई : श्रीगणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व मंडळांनी सहकार्य करावे. मूर्तीची उंची कमी ठेवावी. सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांना दिल्या आहेत. शहरात कृत्रिम तलाव निर्मितीवर भर देण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पालिका व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने निर्विघ्नपणे उत्सव साजरा होण्याकरिता नियोजन केले आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, सुजाता ढोले पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्यासह गणेशोत्सव आयोजन पूर्वतयारी बैठक घेऊन आठही विभाग अधिकारी यांच्याशी बेवसंवाद साधला.

महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकान्वये या वर्षीच्या गणेशोत्सवात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने गर्दी टाळणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. श्रीगणेशमूर्ती दुकानातून घरी आणताना व विसर्जन करताना कमीतकमी व्यक्ती येतील हे पाहावे. तशा प्रकारच्या सूचना गणेशमूर्ती विक्रेत्यांना देऊन याकडे काटेकोर लक्ष द्यावे, असे बांगर म्हणाले.सर्व विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित विभागाचे सहायक आयुक्त आणि पोलीस अधिकारी यांच्या समन्वयाने विभागातील संभाव्य जागांचे सर्वेक्षण करावे. तत्परतेने कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्याच्कृत्रिम तलाव निर्मितीसाठी काही स्वयंसेवी संस्था, गणेशोत्सव मंडळे पुढाकार घेत असल्यास त्यांचे स्वागत असल्याचे सांगत अशा संस्था, मंडळे यांना प्रोत्साहित व सहकार्य करावे, असे सर्व विभागांच्या सह.आयुक्तांना आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. या तलावांची निर्मिती ही श्रीगणेशाच्या आगमनापूर्वी व्हावी, असेही स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.च्नवी मुंबई पालिका क्षेत्रातील २३ मुख्य विसर्जन स्थळांशेजारी कृत्रिम तलाव निर्माण करा. दरवर्षीप्रमाणे सर्व सुयोग्य व्यवस्था करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या. त्यामध्ये निर्माल्याचे ओले व सुके असे संकलन करणे, त्याची योग्य विल्हेवाट लावणे, हार व पूजा साहित्य पाण्यात टाकले जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई