शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षकाच्या कष्टाच्या पैशांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:47 IST

एटीएममधून पैशांचा अपहार करणारी आंतरराष्ट्रीय टोळी शहरात सक्रिय झाली आहे. कोपरखैरणेमधील सुरक्षारक्षकाच्या बँक खात्यामधून तीन दिवसांमध्ये तब्बल १ लाख ५० हजार रुपये परस्पर काढण्यात आले आहेत.

नवी मुंबई : एटीएममधून पैशांचा अपहार करणारी आंतरराष्ट्रीय टोळी शहरात सक्रिय झाली आहे. कोपरखैरणेमधील सुरक्षारक्षकाच्या बँक खात्यामधून तीन दिवसांमध्ये तब्बल १ लाख ५० हजार रुपये परस्पर काढण्यात आले आहेत. कष्टाचे पैसे परत मिळावे यासाठी सुरक्षारक्षक बँकेसह पोलीस स्टेशनमध्ये हेलपाटे घालत असून न्याय मिळावा यासाठी सर्वांना साकडे घालत आहे.सुरक्षारक्षक बोर्डाच्यावतीने एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या विकास भिलारे यांचे युनियन बँकेमध्ये खाते आहे. २५ फेब्रुवारीला त्यांनी बँकेच्या कोपरखैरणेमधील एटीएम सेंटरमधून ३ हजार रूपये काढले होते. यानंतर एटीएममधून पैशांचा अपहार करणाऱ्या टोळीने १२ मार्चला त्यांच्या एटीएममधून कोपरखैरणे एटीएममधूनच दहा हजार रूपये काढले. थोड्या वेळामध्ये पुन्हा दहा व नंतर पाच हजार असे एकूण २५ हजार रूपये काढले. पुन्हा याच दिवशी ४ हजार, दोन वेळा दहा हजार व पुन्हा ५ हजार रूपये काढले. एकाच दिवशी बँक खात्यामधून तब्बल ५४ हजार रूपये काढले. १३ मार्चला एकाच दिवशी ४६ हजार ८९९ रूपये बँकेतून काढले. दोन वेळा दहा हजार, एकवेळ पाच हजार, १२९०० व ८९९९ रूपये बँकेतून काढले. तिसºया दिवशी एटीएममधून पुन्हा २५ हजार रूपये काढण्यात आले असून बंगळुरूमधील लक्ष्मी गारमेंट दुकानामधून २५ हजार रूपयांची खरेदी केली आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल १ लाख ५० हजार ८९९ रूपये कोणीतरी काढले आहेत.भिलारे यांना त्यांच्या बँक खात्यातून पैसे गेल्याची गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांना धक्का बसला आहे. त्यांनी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी त्यांना बँकेत जाण्याचा सल्ला दिला. बँकेत जावून याविषयी विचारणा केल्यानंतर व्यवस्थापनाने त्यांना कोणतीही मदत केली नाही व सायबर सेलकडे तक्रार करण्यास सांगितले. त्यांनी सायबर सेलकडे तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी म्हणणे ऐकून घेतले व पुन्हा बँकेत जावून औपचारिकता पूर्ण करण्यास सांगितले.या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. बँकेनेही या प्रकरणी गांभीर्याने लक्ष दिले नाही. भिलारे यांनी त्यांच्या वेतनातून पैसे वाचवून ठेवले होते. काटकसरीने खर्च करून भविष्यासाठी ठेवलेले पैसे गेल्यामुळे त्यांना धक्का बसला असून याप्रकरणी न्याय देण्याची मागणी केली आहे.टोळी सक्रियबँक खाते हॅक करून पैसे हडपणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय झाली आहे. घणसोली सेक्टर ७ मध्ये राहणाºया वर्षा गोळे यांच्या यांच्या इंड्सइंड बँक खात्यातून एक लाख रूपये काढले आहेत. बंगळुरूमधून हे पैसे काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. भिलारे यांच्या खात्यातूनही बंगळुरूमध्ये खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे.>एवढे पैसे निघाले कसेभिलारे यांच्या बँक खात्यातून तीन दिवसामध्ये १ लाख ५० हजार रूपये गेले आहेत. पहिल्या दिवशी ५४ हजार, दुसºया दिवशी ४६ हजार व तिसºया दिवशी २५ हजार रूपये काढण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना दिवसा जास्तीत जास्त दहा ते २५ हजार रूपये काढता येतात. पण ५० हजार पेक्षा जास्त पैसे काढल्याने बँकेच्या सुरक्षा यंत्रणेविषयीही शंका उपस्थित केली जात आहे.>बँकेसह पोलिसांची उदासीनतासुरक्षारक्षकाच्या बँक खात्यातून तीन दिवसात दीड लाख रूपये गेले. घणसोलीमधील एका व्यक्तीच्या खात्यातून एक लाख रूपयांचा अपहार झाला. दोन्ही प्रकारामध्ये अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. बँकांनीही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. या प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी होवू लागली आहे.>कष्ट करून साठविलेल्या पैशातील दीड लाख रूपये तीन दिवसांत चोरट्यांनी हडप केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना पकडावे व बँकेने पैसे परत मिळवून द्यावे एवढीच अपेक्षा आहे.- विकास भिलारे, सुरक्षारक्षक