शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

व्यापारी अन् शासनाविरोधात पर्ससीन मच्छीमारांचा एल्गार, बोटी बंद ठेऊन निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 23:32 IST

ससुनडॉक बंदरात बोटी बंद ठेऊन निषेध 

मधुकर ठाकूर

उरण :  सातत्याने होणारी डिझेल दरवाढ,भडकती महागाई, १२० अश्वशक्ती क्षमतेच्या मच्छीमारांना डिझेल कोटा देण्यासाठी शासनाकडून केलेली बंदी,लिलावधारकांकडून होणारी लुबाडणूक, मासळीचे घसरते भाव त्यानंतरही समुद्रातील मासेमारीसाठी खर्च केलेली रक्कमही हाती नसल्याने शुक्रवारी मुंबई येथील ससुनडॉक बंदरात शेकडो पर्ससीन पध्दतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी बोटी बंद ठेऊन शासनाविरोधात आपला राग व्यक्त केला.     

राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर,ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यांतील १२० हॉर्स पॉवर पेक्षाही अधिक अश्वशक्ती असणाऱ्या  मच्छीमार नौकांना शासनाने डिझेल कोटा बंद केला आहे. डिझेलचे कोट्यावधींचे थकित परतावेही मिळत नाहीत.त्यातच प्रत्येक १०-१२ दिवसांच्या एका ट्रिपसाठी १८ खलाशी, डिझेल,बर्फ,रेशन, पाणी आणि अन्य बाबींसाठी तीन लाखांहूनही अधिक खर्च होत आहे.मात्र त्यानंतर मासळीला लिलावदार, व्यापाऱ्यांकडून पुरेसा भाव मिळत नाही.सुरमई , तेल बांगडा,काट बांगडा,टूणा,नारबा आदी प्रकारच्या मासळीचे भावात निम्म्याने घसरले आहेत.यामध्ये निर्यातदार,लिलावदार, व्यापाऱ्यांकडून मच्छीमारांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली जात आहे.यामुळे एका ट्रिपसाठी खर्च केलेली रक्कम मच्छीमारांच्या हाती लागत नाही.यामुळे मच्छीमारांवरउपासमारीचे संकट आले आहे.   

१२० अश्वशक्ती इंजिनवरील मच्छीमार नौकांना डिझेल कोट्याच्या प्रस्तावातून वगळण्याचा निर्णय रद्द करुन डिझेल कोटा पुर्ववत सुरू करणे, मच्छीमारांना कोट्यावधींची थकित असलेल्या डिझेल परताव्याची रक्कम अदा करण्यात यावी,मासळीला योग्य भाव मिळावा, निर्यातदार,लिलावदार व व्यापाऱ्यांकडून मच्छीमारांची होणारी लुबाडणूक थांबविण्यात यावी, यासाठी शुक्रवारी (११) मुंबई येथील ससुनडॉक बंदरात शेकडो पर्ससीन पध्दतीने मासेमारी करणाऱ्या शेकडो मच्छीमारांनी बोटी बंद ठेऊन शासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला. यामध्ये मुंबई, मोरा,करंजा, दिघोडे, रेवस, ट्रॉम्बे, माहुर,ठाणे येथील मच्छीमार बोटींचा समावेश होता. मच्छीमारांच्या समस्यांचा वेळेत निपटारा करण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्यात याव्यात अशी आग्रही मागणीही मुंबई पर्ससीन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाखवा, संचालक रमेश नाखवा, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कष्टकरी खलाशी महासंघाचे अध्यक्ष सिताराम पटेकर यांनी या बंद दरम्यान केली आहे. तसेच या विरोधात आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यासाठी करंजा येथे तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे.या बैठकीतच आंदोलनाची रणनीती ठरविण्यात येणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfishermanमच्छीमार