शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या अकरा कर्मचाऱ्यांनी केली सिडकोचीच फसवणूक; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 06:15 IST

सोसायटीसाठी भूखंड मिळवून घातला विकासकाच्या घशात

सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : सिडकोच्या कर्मचाऱ्यांनीच मिळून सिडकोची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये सिडकोच्या तत्कालीन अधिकाºयांसह कर्मचाºयांचाही समावेश आहे. त्यांनी कर्मचाºयांच्या गृहनिर्माण सोसायटीसाठी भूखंड मिळवून तो विकासकाच्या घशात घातला होता.

सिडकोच्या तीस कर्मचाºयांनी एकत्रित येऊन स्नेहपुष्प को-आॅप. सोसायटी स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी १९९४ साली सिडकोकडे भूखंडासाठी अर्ज केला होता. त्यानंतर २००२ मध्ये भूखंडाचे ७३ लाख ७९ हजार ३१० रुपये भरल्यानंतर त्यांना नेरूळ सेक्टर ४० येथील ९ व १० क्रमांकाचा भूखंड त्यांना केवळ निवासी वापरासाठी वितरित करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र हा भूखंड विकासकाच्या घशात घालण्याच्या अनुषंगाने बनावट कागदपत्रे तयार करून ती सिडकोकडे सादर केली होती. त्याची कल्पना असतानाही तत्कालीन सिडको अधिकाºयांनी त्याकडे दुर्लक्ष करून भूखंडाचे वाटप केले. त्यामध्ये प्रस्तावित गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी व तत्कालीन सिडको अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे. केवळ सिडको कर्मचाºयांसाठी गृहनिर्माण सोसायटी बनवली असतानाही त्यामध्ये सभासद म्हणून विकासकाला घेण्यात आले होते. त्यानंतर भूखंडाची ७३ लाखांची रक्कमदेखील त्याच विकासकाने सिडकोकडे भरली होती. याकरिता त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून ती सिडकोकडे सादर केली होती. त्याद्वारे सोसायटीसाठी भूखंड मंजूर करून त्याचा पूर्णपणे ताबा खासगी विकासकाला देण्यात आला. विकासकाने त्या ठिकाणी वाणिज्य व निवासी वापरासाठी इमारत उभारली असता सिडको अधिकाºयांच्या पाहणीत ही बाब समोर आली. मात्र मागील काही वर्षांपासून सदर इमारतीचे बांधकामही अर्धवट स्थितीमध्ये आहे.अठरा वर्षांनी प्रकरण उघडसिडको कर्मचाºयांनीच गृहनिर्माण संस्थेच्या नावे अल्पदरात भूखंड मिळवून तो विकासकाला विकल्याची बाब अठरा वर्षांनी उघडकीस आली. या प्रकरणी संबंधितांविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये सिडकोच्या तत्कालीन सहायक वसाहत अधिकाºयांसह, तत्कालीन क्षेत्राधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे. सिडकोकडून गृहनिर्माण संस्थांना भूखंड दिले जात असल्याची संधी साधून सिडकोच्याच कर्मचाºयांनी एकत्रितरीत्या हा भूखंडाचा अपहार केला आहे.

टॅग्स :cidcoसिडकोfraudधोकेबाजी