शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
3
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
4
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
5
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
6
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
7
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
8
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
9
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
10
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
11
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
12
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
13
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
14
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
15
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
16
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
17
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
18
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
19
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
20
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?

एलिव्हेटेड मार्ग आले दृष्टिपथात

By admin | Updated: July 7, 2015 02:26 IST

शहरातील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने महापालिकेने प्रस्तावित केलेल्या वाशी-उलवे आणि वाशी-ऐरोली या दोन एलिव्हेटेड मार्गांना राज्याच्या पर्यावरण विभागाने

कमलाकर कांबळे  नवी मुंबईशहरातील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने महापालिकेने प्रस्तावित केलेल्या वाशी-उलवे आणि वाशी-ऐरोली या दोन एलिव्हेटेड मार्गांना राज्याच्या पर्यावरण विभागाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. या दोन्ही मार्गाचा विस्तृत आराखडा तयार करून तो सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र कोस्टल मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटीने महापालिकेला केल्या आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणारे हे प्रकल्प दृष्टिपथात आले आहेत.सध्या पामबीचवर वाहतुकीचा ताण वाढतो आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. प्रस्तावित विमानतळामुळे यात आणखी भर पडणार आहे. हे लक्षात घेवून महापालिकेने शहरातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून वाशी ते ऐरोली व वाशी ते उलवे असे दोन एलिव्हेटेड रस्ते बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. वाशी रेल्वे स्थानक ते थेट उलवेपर्यंतचा २0 किमी लांबीचा हा रस्ता उन्नत अर्थात एलिव्हेटेड स्वरूपाचा असणार आहे. तो बनविण्यासाठी मोठ्याप्रमाणात खारफुटी तोडावी लागणार आहे. त्याचप्रमाणे वाशी-ऐरोली दरम्यानच्या ११ किमी लांबीच्या मार्गातही खारफुटीचा अडथळा आहे. त्यासाठी संबंधित विभागाची परवानगी आवश्यक आहे. महापालिकेने त्यासाठी एमसीझेडएकडे प्रस्ताव पाठविला होता. एमसीझेडएने त्यास अलीकडेच हिरवा कंदील दाखवत या बहुद्देशीय प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता दिली आहे. तसेच या दोन्ही मार्गांचा प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. प्रस्तावित विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वाशी-उलवे दरम्यानचा प्रस्तावित मार्ग उपयुक्त व सोयीचा ठरणार आहे. सायन-पनवेल महामार्गावरून दिवसाला सुमारे दीड ते दोन लाख वाहने ये-जा करतात. यापैकी काही वाहने सरळ पनवेलमार्गे पुढे जातात, तर काही ठाण्याच्या दिशेने जातात. इतकेच नव्हे, तर ठाण्याकडे जाणारी वाहने वाशीमार्गे पुढे कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या उपनगरातून जातात.