शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

देशी विदेशी लाखो पर्यटकांच्या गर्दीने बहरले एलिफंटा बेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 19:32 IST

सणासुदीच्या आठ दिवसांत पर्यटकांची संख्या तीनपटीने वाढली

मधुकर ठाकूर

उरण : मागील १० दिवसांपासून सुट्ट्या, सणाच्या निमित्ताने गेटवे ऑफ इंडिया वरुन एलिफंटा बेटावर लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या तीनपटीने वाढली आहे.नवीन वर्षांच्या पहिल्या आठवड्यापर्यत तरी बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांचा वाढता ओघ कायमच राहणार असल्याची शक्यता आहे.मात्र रविवारी (३१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेटवे ऑफ इंडियाला दिलेल्या भेटीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव सकाळीच एलिफंटा ,मांडवा सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तीन तास बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे हजारो पर्यटकांचा खोळंबा झाला असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्था, मुंबई मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा दरम्यान जलमार्गावरुन दररोज साधारणपणे दोन हजारपर्यत देशी-विदेशी पर्यटक घारापुरी लेणी पाहण्यासाठी येतात.सण, सुट्टीत यामध्ये थोडीफार वाढ होते.मात्र ख्रिसमस, थर्टी फर्स्ट,नवीन वर्षाच्या अगोदरपासूनच एलिफंटा बेटावर पर्यटनासाठी येणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांची संख्या दुपटीहूनही अधिक वाढली असल्याची माहिती मुंबई मेरिटाईम बोर्डाचे घारापुरी बंदर निरीक्षक विनायक करंजे यांनी दिली.तर एलिफंटाच बेटावरच नव्हे तर गेटवे ऑफ इंडिया येथुन मांडवा - अलिबाग जलमार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तोबा गर्दी झाली आहे.त्यामुळे मागील आठ-दहा दिवसांपासून एलिफंटा , अलिबाग -मांडवा या  सागरी मार्गावरील प्रवाशांची वाहतूक तीन पटीने वाढली आहे.

त्यामुळे जलवाहतूकीवरही प्रचंड ताण पडला आहे.नवीन वर्षातही एलिफंटा बेटावर जाणाऱ्या पर्यटकांचा वाढता ओघ कायम राहणार असल्याची शक्यताही मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव मामुमुल्ला आणि मुंबई मेरिटाईम बोर्डाचे घारापुरी बंदर निरीक्षक विनायक करंजे यांनी माहिती देताना व्यक्त केली आहे.तर मागील ८-१० दिवसांपासून घारापुरी बेटावर देशी-विदेशी पर्यटकांचा ओघ दुपटीहून अधिक वाढला असल्यामुळे कार्यरत असलेल्या विविध विभागांच्या सुरक्षा यंत्रणांवरही प्रचंड प्रमाणात ताण वाढला असल्याचे घारापुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी सांगितले.

 उरण येथील पीरवाडी बीच, पीरवाडी दर्गा आदी ठिकाणी पिकनिकसाठी येणाऱ्या हौशी पर्यटकांच्या संख्येत मागील आठ-दहा दिवसांपासून वाढ झाली आहे.त्यामुळे भाऊचा धक्का -मोरा या सागरी मार्गावरील प्रवाशांच्या वाहतूकीतही दुपटीने वाढ झाली असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक एन.एस.कोळी यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांमुळे हजारो पर्यटकांचा तीन तास खोळंबा

गेटवे ऑफ इंडियाच्या मुंबई येथील ऐतिहासिक स्मारकाला  रविवारी (३१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच भेट दिली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या भेटी दरम्यान सूरक्षेच्या कारणास्तव गेटवे ऑफ इंडिया परिसर बंद ठेवण्यात आला होता. यामुळे तीन तास सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने एलिफंटा, मांडवा येथे जाणाऱ्या हजारो पर्यटकांचा चांगलाच खोळंबा झाला. सकाळी ११ वाजल्यानंतरच एलिफंटा, मांडवा या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव मामुमुल्ला यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरण