शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीएच्या दोन कामगार ट्रस्टी पदासाठी १५ नोव्हेंबरला निवडणूक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 21:29 IST

मागील दिड वर्षांपासून सातत्याने विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या जेएनपीएच्या दोन कामगार ट्रस्टी पदाच्या निवडणुकीसाठी अखेर मुहूर्त सापडला आहे.

मधुकर ठाकूर

उरण :

मागील दिड वर्षांपासून सातत्याने विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या जेएनपीएच्या दोन कामगार ट्रस्टी पदाच्या निवडणुकीसाठी अखेर मुहूर्त सापडला आहे. कामगार ट्र्स्टी पदासाठी १५ नोव्हेंबर रोजी निवडणूक घेण्याची घोषणा केंद्रीय श्रम आयुक्तांनी आज पत्राद्वारे केली आहे. दिवाळीनंतर प्रचाराचा धुरळा उडणार असल्याने जेएनपीएच्या मान्यता प्राप्त चार कामगार संघटनांची धावाधाव सुरू झाली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ऐवजी ॲथोरिटीॲक्ट स्थापन झाला आहे.जानेवारी २०२२ पासून बंदराचे कामकाज या ॲथोरिटी ॲक्टनुसारच सुरूही झाले आहे.प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे.दरम्यान तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या दोन कामगार ट्र्स्टींची मुदत वर्षांपूर्वीच तर आणखी मार्च २०२२ पर्यंत देण्यात आलेली एक वर्षाची मुदतवाढही संपुष्टात आली आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये दोन कामगार ट्र्स्टी पदासाठी निवडणूक घेणे अपेक्षित होते.दरम्यान केंद्रीय श्रम आयुक्तांनी दोन कामगार नियुक्त ट्र्स्टी पदासाठी येत्या २ ऑगस्ट रोजी गुप्त मतदानाने निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते.मात्र निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याआधीच निवडणूकीची तारीख जाहीर करण्यात आल्याने जाहीर करण्यात आलेली निवडणूक रद्द करण्यात नामुष्कीची वेळ जेएनपीए प्रशासनावर आली होती. पुन्हा निवडून लांबणीवर पडल्याने मात्र कामगार आणि कामगार संघटनांमध्ये असंतोष पसरला होता. त्यानंतर  विविध कामगार संघटना आणि जेएनपीएच्या प्रशासनाच्या रेट्यामुळे दुसऱ्यांदा लांबणीवर पडलेली कामगार ट्र्स्टी पदांची निवडणूक शुक्रवारी (२१) जाहीर झाली आहे. कामगार ट्र्स्टी पदासाठी १५ नोव्हेंबर रोजी निवडणूक घेण्याचे आदेश केंद्रीय श्रम आयुक्तांनी पत्राद्वारे दिले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 जेएनपीएच्या सुमारे ५०० कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर फक्त ६५३ मतदार कामगार उरले आहेत. या दोन ट्र्स्टी पदाच्या निवडणूकीत जेएनपीटी कामगार एकता संघटना,न्हावा-शेवा बंदर कामगार (अंतर्गत) संघटना, जेएनपीटी वर्कर्स युनियन, न्हावा-शेवा पोर्ट ॲण्ड जनरल वर्कर्स युनियन या मान्यता प्राप्त कामगार संघटना निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहेत. निवडणुकीसाठी बंदरातील मान्यता प्राप्त कामगार संघटनांनी जय्यत तयारीही सुरू केली आहे.त्यामुळे दिवाळीनंतर प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

टॅग्स :JNPTजेएनपीटी