शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोग सत्ताधा-यांच्या हातचे बाहुले, शरद पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 14:12 IST

निवडणूक आयोग सत्ताधा-यांच्या हातचे बाहुले बनल्याची शंका निर्माण होत आहे. लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे, असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

नवी मुंबई- निवडणूक आयोग सत्ताधा-यांच्या हातचे बाहुले बनल्याची शंका निर्माण होत आहे. लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे, असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते नवी मुंबईत बोलत होते. कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अवघड नाही. सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. सत्तेचा गैरवापर करणं चुकीचं असल्याचं म्हणत पवारांनी भाजपावर निशाणा साधला आहे.कशाची पार्श्वभूमी नसताना शिवछत्रपतींनी जनतेच स्वराज्य निर्माण केलं. मोठी पार्श्वभूमी छत्रपतींना नव्हती. अनेक घटक त्यांच्या सैन्यामध्ये सामील होते. त्यांच्या मदतीने उभं केलेलं राज्य लोकांसाठी निर्माण केलं. प्रतिगामी शक्तीला लगाम घालण्याच्या दृष्टीने ही निवडणूक आहे. संघटित येऊन परिवर्तनाची चळवळ उभारण्याची गरज आहे. सत्ता आल्यानंतर माजायचे नसते. पण भाजपला याचा विसर पडला आहे.कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारावर दबाव आणला. सत्तेचा गैरवापर केला. पण तेथील जनतेने हा दबाव झुगारुन लावला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खटले भरले. एकूणच देशभरात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. शेतकरी संकटात आहे. पिकवलेला माल रस्त्यावर फेकून देत आहेत. पण सरकार दखल घेत नाही. देशभरात शेतक-यांची स्थिती सारखीच आहे. पण शेतक-यांनी कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी करू नये.सध्या लोकांचे मतपरिवर्तन होत आहे. विविध पोटनिवडणुकीतून हे स्पष्ट झाले आहे. पालघरमध्ये विविध पक्षांनी एकत्रित येऊन हितेंद्र ठाकूर यांना विचारात घेतले असते तर चित्र वेगळे असते. गोंदियाच्या पोटनिवडणुकीत मोठा गोंधळ करण्यात आला. निवडणूक यंत्र बंद पडली. उन्हामुळे हे यंत्र बंद पडल्याचा हास्यास्पद खुलासा करण्यात आला. एकूणच या निवडणुकीत भाजपाने साम, दाम आणि दंड या भूमिकेचा सत्ताधा-यांकडून अवलंब करण्यात आला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार