शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध महिलेला उपचाराविनाच घरी पाठविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 02:58 IST

महापालिकेच्या रुग्णालयात ऐरोली येथील एका वृद्ध आजारी महिलेवर जुजबी उपचार करून रात्रीच्या वेळी तिला घरी पाठविल्याची धक्कादायक घटना महापालिकेच्या वाशी येथील प्रथमसंदर्भ रुग्णालयात घडली आहे.

- अनंत पाटील नवी मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयात ऐरोली येथील एका वृद्ध आजारी महिलेवर जुजबी उपचार करून रात्रीच्या वेळी तिला घरी पाठविल्याची धक्कादायक घटना महापालिकेच्या वाशी येथील प्रथमसंदर्भ रुग्णालयात घडली आहे. पीडित महिलेच्या नातेवाइकांनी रुग्णालय व्यवस्थापनाच्या या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. योग्य उपचाराअभावी या महिलेचे काही बरेवाईट झाले असते, तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, ऐरोली सेक्टर १५ येथे राहणाऱ्या सुचिता देशमुख यांच्या सासूबाई यमुना गोपाळ देशमुख (७०) या गेल्या चार वर्षांपासून कॅन्सरने आजारी आहेत. आॅक्टोबर २०१७ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्याशिवाय त्यांना अनेक दुर्धर आजार झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी यमुनाबाई यांच्या पोटाला सूज आली होती, तसेच लघवीला त्रास होऊ लागला. असह्य पोटदुखी सुरू झाली. काही वेळाने बरे वाटेल या आशेवर त्यांनी वेळ काढून नेला; परंतु मंगळवारी रात्री त्यांच्या वेदना वाढल्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना खासगी गाडीतून महापालिकेच्या वाशी रुग्णालयात आणले. रुग्णालयात त्या वेळी बहुतेक शिकाऊ डॉक्टर होते. दोन-तीन डॉक्टरांनी तिची चौकशी केली. तपासणीचा केवळ आव आणला. वास्तविकपणे यमुनाबाईची गंभीर प्रकृती पाहता त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार करणे गरजेचे होते; परंतु तेथील डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात बेड रिकामे नसल्याचे कारण देत त्यांना घरी जाण्यास सांगितले. तत्पूर्वी त्यांना वेदनाशामक इंजेक्शन देऊन काही औषधे लिहून दिली. विशेष म्हणजे, लिहून दिलेल्या औषधांपैकी फक्त एकच औषध रुग्णालयाच्या मेडिकलमध्ये उपलब्ध झाले. रुग्णालयात रात्रीच्या वेळी आलेला हा अनुभव यमुनाबाईच्या सून सुचिता देशमुख यांनी ‘लोकमत’ला सांगितला. या प्रकारानंतर पालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांचे कसे हाल होतात हे समोर आले.रु ग्ण गंभीर अवस्थेत असेल तरी त्याकडे तातडीने लक्ष दिले जात नाही. विनवण्या केल्यानंतर आधी शिकाऊ डॉक्टर रुग्ण तपासतात, त्यानंतर उपकाराचा भाव ठेवून कार्यरत डॉक्टर रुग्णाची तपासणी करतात. रुग्णालयात बेड उपलब्ध नाही, हे कारण सांगून नातेवाइकांना घालवून देण्याचा प्रकार सर्रास घडत असल्याच्या तक्रारी आहेत.>यमुनाबाई देशमुख या रु ग्ण आजीला मधुमेह आणि इतर आजारांनी ग्रासले आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करणे आवश्यक होते; परंतु बेड शिल्लक नसल्याने त्यांना खाली झोपवणे योग्य नव्हते. त्यामुळे त्यांना औषधे, इंजेक्शन गोळ्या देऊन घरी पाठवले.- डॉ. प्रशांत जवादे,मुख्य वैद्यकीय अधीक्षक,वाशी संदर्भ रु ग्णालय,महापालिका