शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजासह माथाडी कामगारांना न्याय देणार- एकनाथ शिंदे

By नामदेव मोरे | Updated: September 25, 2022 13:40 IST

राज्यातील सरकार सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी कामगारांचे आहे. सरकार सर्वांची जबाबदारी घेणारे सरकार आहे.

नवी मुंबई:

राज्यातील सरकार सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी कामगारांचे आहे. सरकार सर्वांची जबाबदारी घेणारे सरकार आहे. मराठा समाजासह माथाडी कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. माथाडी कामगारांच्या घराचे प्रश्न सोडविले जातील.  गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई केली जाईल.  मराठा समाजाचे प्रश्न सोडविले जातील.  हे सरकार जबाबदारी घेणारे, निर्णय घेणारे सरकार आहे.कामाचा धडाका पाहून काहींना धडकी भरली आहे.राज्यात 75 हजार नोकरभरती केली जाणार असल्याचेही सांगितले.    कामगार मंत्री सुरेश खाडे यांनीही कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.

वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकणार- देवेंद्र फडणवीस माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. माथाडींच्या नावाखाली काही जण वसुलीचे काम करत आहेत.  अशा वसुली सम्राटांना जेलमध्ये टाकणार असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. अशोक चव्हाण व मागील सरकारमुळेच मराठा आरक्षण गेले- नरेंद्र पाटील यांचा आरोपमागील सरकारच्या काळात अडीच वर्षात मराठा समाजावर अन्याय झाला. अशोक चव्हाण यांनी आरक्षण घालविले.  चव्हाण यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली असती तर परिस्थिती वेगळी दिसली असती.अण्णासाहेब पाटील महामंडळाचे प्रश्न ही सुटले नाहीत असे मतही पाटील यांनी व्यक्त केले.

नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील महामंडळ देणारमाथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी यापूर्वी अण्णासाहेब पाटील महामंडळाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. पन्नास हजार मराठा उद्योजक घडविले.  त्यांच्याकडे पुन्हा महामंडळाची धुरा दिली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

देशद्रोही कृत्य खपवून घेतलेजाणारनाही- मुख्यमंत्रीपुणे येथे पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्याच्या घटनेविषयी एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाई चे संकेत दिले. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भुमी आहे. येथे देशद्रोही कृत्य खपवून घेतले जाणार नाहीत.संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई येथे माथाडी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे