शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:56 IST

शिक्षकांसह लोकप्रतिनिधींनीही केले विद्यार्थ्यांचे स्वागत

नवी मुंबई/पनवेल : नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरामधील शाळांचा परिसर सोमवारी गजबजला होता. विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांमुळे शाळांच्या प्रवेशद्वारावरही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत होते. पहिल्याच दिवशी शालेय साहित्याचे वाटप केल्यामुळे व शिक्षकांनी स्वागत केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस उत्साहाचा होता. पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद, पनवेल महापालिकेसह खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवसाचे औचित्य साधून जल्लोषात स्वागत करण्यात आले. विविध शाळांमध्ये यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पनवेल महापालिकेच्या श्री गणेश विद्यामंदिर शाळा धाकटा खांदा याठिकाणी पालिकेच्या माध्यमातून स्वागताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला आयुक्त गणेश देशमुख, महापौर कविता चौतमोल उपस्थित होत्या. आयुक्तांनी स्वत: विद्यार्थ्यांच्या हाताला धरून शाळेत स्वागत केले.शेकडो विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यावेळी उपस्थित होते. खारघर शहरातील कोपरागावातील ग्रामविकास मंडळाच्या शाळेत देखील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्यात आली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.मनपा शाळेतही उत्साहनवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. रबाळे येथील शाळेमध्ये माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले. इंदिरानगरमध्ये महेश कोठीवाले व इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले. शाळा क्रमांक २८ मध्ये शाळा समिती सदस्य जनार्दन मोरे, मुख्याध्यापक नंदकुमार पाटील व इतरांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

टॅग्स :Schoolशाळा