शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, आता सुरक्षित वातावरण: मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 09:09 IST

६ हजार कोटींच्या कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : राज्यात पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडत होते. आता उद्योगांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना येथे अप्रत्यक्षपणे लगावला. राज्यात नवीन उद्योग येत असून, कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सिडको क्षेत्रामधील ५ हजार कोटी व नवी मुंबई महानगरपालिकेच्या १,१२९ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. राज्याची औद्योगिकदृष्ट्या भरभराट सुरू आहे. नवीन उद्योग येत आहेत. गुंतवणूक वाढत आहे. राज्यातील उद्योग पळविले जात असल्याचे बोलणाऱ्यांच्या काळातच उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडत होते. आता संपूर्ण राज्यात सुरक्षित वातावरण आहे. नवीन उद्योगांना सर्व परवाने लवकर मिळवून देण्यासाठी सिंगल विंडो सिस्टम कार्यरत असल्याचेही  त्यांनी सांगितले.

प्रगतीच्या इंजिनची नवी मुंबई अश्वशक्ती नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता व पायाभूत सुविधांच्या बाबतीत उत्तम काम केले आहे. नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविले जात आहेत. राज्याच्या प्रगतीच्या इंजिनची नवी मुंबई अश्वशक्ती असल्याचेही त्यांनी सांगितले.

एमएमआर विभागात नवीन प्रकल्प

सिडकोच्या माध्यमातून विमानतळाचे काम गतीने सुरू आहे. विमानतळाचे काम वेळेत पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात विकासासाठी खूप संधी असून, शासनाच्या माध्यमातून या परिसरात व एमएमआर विभागात नवीन प्रकल्प सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, आ. गणेश नाईक, आ. मंदा म्हात्रे, आ. महेश बालदी, आ. रमेश पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल उपस्थित होते.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे