शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गावाला शाळेसाठी एक भूखंड, सिडकोचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:53 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे स्थलांतरित होणाऱ्या दहा गावांतील ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुनर्वसन व पुन:स्थापनेच्या ठिकाणी शाळेसाठी प्रत्येक गावाला एक भूखंड देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे स्थलांतरित होणाऱ्या दहा गावांतील ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुनर्वसन व पुन:स्थापनेच्या ठिकाणी शाळेसाठी प्रत्येक गावाला एक भूखंड देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. तशा आशयाचे पत्र सिडकोने रायगड जिल्हा परिषदेला दिले आहे, त्यामुळे शाळांच्या स्थलांतराविषयी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे.विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणाºया दहा गावांच्या स्थलांतर प्रक्रियेने वेग घेतला आहे. तरघर, कोंबडभुजे, उलवे, गणेशपुरी, वाघिवलीवाडा, वरचे ओवळे, कोल्ही, कोपर, चिंचपाडा व वाघिवली या गावांचा यात सहभाग आहे. या गावांचे वाहळ, वडघर आणि कुंडे वाहळ या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे. स्थलांतरित होणाºया गावांसाठी सध्या शाळेच्या दोन सुसज्ज इमारती बांधल्या आहेत; परंतु या शाळेत स्थलांतरित होण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला होता. स्थलांतरित होणाºया प्रत्येक गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्यानुसार प्रत्येक गावासाठी स्वतंत्र शाळा मिळावी, अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती.या मागणीच्या पार्श्वभूमीवर सिडकोने प्रत्येक गावाला शाळेसाठी स्वतंत्र भूखंड देण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचे पत्र जिल्हा परिषदेला दिले आहे, त्यामुळे नवीन शाळांची इमारत पूर्ण होईपर्यंत ग्रामस्थांनी सध्या तयार असलेल्या शाळेच्या दोन इमारतींतस्थलांतर करण्याची तयारीदर्शविल्याने तूर्तास या वादावर पडदा पडला आहे.दहा गावांच्या स्थलांतरालाही गतीशाळा स्थलांतराचा प्रश्न निकाली निघाला असला, तरी दहा गावांतील ३००० कुटुंबांची स्थलांतर प्रक्रिया अद्यापि कूर्मगतीने सुरू आहे. गावांच्या स्थलांतरासाठी सिडकोने नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. तरीही स्थलांतराला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.ग्रामस्थांकडून स्थलांतराला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तीन हजार कुटुंबांपैकी आतापर्यंत सुमारे १८०० कुटुंबांनी आपले जुने बांधकामे पाडून स्थलांतर केले आहे. येत्या काळात या प्रक्रियेला गती प्राप्त होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.

टॅग्स :cidcoसिडको