शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

डम्पिंग ग्राउंडलगत अनधिकृत भंगार साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:24 IST

तुर्भे एमआयडीसीमधील प्रकार

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी येथील डम्पिंग ग्राउंडलगत अनधिकृतपणे भंगाराचे गोदाम चालवले जात आहेत. त्याकरिता कुंपण घातलेल्या मोकळ्या भूखंडाचा बेकायदा वापरत होत असतानाही प्रशासनाची डोळेझाक होत आहे. मात्र, भंगारात साठवल्या जात असलेल्या ज्वलनशील वस्तूंमुळे परिसराला धोका निर्माण झाला आहे.

तुर्भे एमआयडीसी परिसरात अनधिकृत गोदाम वाढत आहेत. मोकळ्या भूखंडांसह बंद कंपन्यांच्या ठिकाणी गोदाम चालवले जात आहेत. मात्र, त्याकडे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने भंगार व्यावसायिकांच्या धंद्याला तेजी आल्याचे परिसरात पाहायला मिळत आहे. त्याकरिता कुंपण घातलेल्या भिंतींचा देखील उघडपणे वापर होऊ लागला आहे. असाच प्रकार तुर्भे एमआयडीसी येथील पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडलगत पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी मोकळ्या मैदानाच्या भिंतीला शिडी लावून आतमध्ये जाण्याचा मार्ग तयार करण्यात आला आहे. त्याठिकाणी सात ते आठ अनधिकृत गोडाऊन चालवले जात आहेत. शहरात ठिकठिकाणावरून जमा केलेले भंगार व औद्योगिक परिसरातील टाकाऊ साहित्य जमा करून त्याठिकाणी ठेवले जात आहे. त्यामध्ये ज्वलनशील वस्तूंचाही समावेश असल्याने भविष्यात संपूर्ण परिसराला धोका उद्भवण्याची भीती शेकापचे जिल्हा कार्यालय सरचिटणीस गोविंद साळुंखे यांनी व्यक्त केली आहे.अतिक्रमणाच्या विळख्यात गेलेला हा भूखंडावर गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. त्यांच्याकडून पादचाºयांच्या जीविताला धोका उद्भवत असून अनेकांनी तशी भीती देखील व्यक्त केलेली आहे. यामुळे संबंधित प्रशासनाकडून अनधिकृत गोडाऊन हटवण्याची मागणी गोविंद साळुंखे यांनी केली आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न