शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्तीमुळे धबधबे ठरताहेत मृत्यूचा सापळा; राज्यात १४ पर्यटकांचा मृत्यू

By नामदेव मोरे | Updated: July 10, 2024 10:24 IST

पावसाळी पर्यटनासाठी हवी कडक नियमावली

नवी मुंबई: पाऊस सुरू होताच राज्यातील सर्व धबधब्यांवर हौशी पर्यटकांचा महापूर येऊ लागला आहे. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसविल्यामुळे धबधबे मृत्यूचा सापळा ठरू लागले आहेत. सहा जूनपासून आतापर्यंत राज्यातील विविध धबधबे व समुद्रकिनाऱ्यांवर १४ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघात रोखण्यासाठी शासनाने कडक नियमावली करावी व प्रशासनाने त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, बेशिस्तपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

ताह्मिणी घाटातील मिल्कीबार धबधब्यामध्ये तरुणाने टाकलेली उडी व त्याचा झालेला मृत्यू याविषयीचा व्हिडीओ प्रसारमाध्यमांवर देशभर व्हायरल होऊ लागला आहे. लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात एकाच कुटुंबामधील पाच जणांचा धबधब्यात बुडून मृत्यू झाल्याचा व्हिडीओही प्रसारमाध्यमांमधून व्हायरल झाला. या अपघातांविषयी हळहळ व्यक्त करण्यात आली. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील भुशी डॅम, ताम्हिणी घाट, कुंडलिका नदी पात्र, अलिबाग समुद्र, बदलापूरमधील कोंडेश्वर धबधबा, भामरागड येथील बिनाकुंडा धबधबा, लांजा येथील बेर्डेवाडी धबधबा व सातारा येथील केळवली धबधब्यावरही दुर्घटना घडली आहे. भामरागड येथील दुर्घटनेमध्ये चार दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा व त्याला वाचविण्यासाठी गेलेला दुसरा तरुण त्यांच्या कुटुंबीयांसमोरच वाहून गेला.

धबधब्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी शासन, प्रशासन, स्थानिक वनसमित्या यांनी योग्य नियमावली तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. पर्यटकांनीही स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. -सुनील गायकवाड, सचिव, शिवदुर्ग मित्र, लोणावळा

महाराष्ट्रातील दुर्घटना

५ जून - ताम्हिणी घाटातील मिल्कीबार धबधब्यात दरीत कोसळून एकाचा मृत्यू११ जून - गडचिरोली भामरागड येथील बिनागुंडा धबधब्यात तरुणाचा, त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू१७ जून - लांजा येथील वेरवली बेर्डेवाडी धबधब्यात २५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू२७ जून - बदलापूर कोंडेश्वर धबधब्यात बुडून ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू१३ जून - अलिबाग येथे समुद्रात पोहताना मूळ छत्रपती संभाजीनगर व आता आळंदी येथे राहणाऱ्या तरुणाचा मृत्यू२९ जून - ताह्मिणी घाटातील मिल्कीबार धबधब्यामध्ये बुडून एकाचा मृत्यू३० जून - भुशी डॅमजवळील धबधब्यामध्ये बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू३० जून - सातारामधील केळवली धबधब्यामध्ये २२ वर्षीय तरुण वाहून गेला७ जुलै - कुंडलिका नदीपात्रात रिव्हर राफ्टिंग करताना अभियंत्याचा मृत्यू 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबईPuneपुणेRaigadरायगड