शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सहा मतदारसंघ संपुष्टात

By admin | Updated: September 30, 2016 04:04 IST

पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेमुळे रायगड जिल्हा परिषदेतील ६२ मतदार संघातील सहा मतदार संघ जणू संपुष्टातच आले आहेत. सहापैकी पाच मतदार संघावर शेकापचे

- आविष्कार देसाई,  अलिबागपनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेमुळे रायगड जिल्हा परिषदेतील ६२ मतदार संघातील सहा मतदार संघ जणू संपुष्टातच आले आहेत. सहापैकी पाच मतदार संघावर शेकापचे तर, एका मतदार संघावर काँग्रेसचे असणारे प्राबल्यही नवीन मतदार संघाच्या निर्मितीमध्ये पुसले जाणार आहेत. दिग्गजांना नवीन मतदार संघाचा शोध घेतानाच नव्याने निर्माण होणाऱ्या मतदार संघात आपापल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मतदारांची बांधणी करावी लागणार आहे.पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण १० मतदार संघ आहेत. त्यापैकी आठ जागा शेकापकडे, तर दोन जागा या काँग्रेसच्या ताब्यात आहेत. पनवेल महानगर पालिकेत सहा मतदार संघ जाणार आहेत. मतदार संघाची पुनर्रचना झाल्यावरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.रायगड जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबलावर नजर टाकल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडे २० जिल्हा परिषद सदस्य आहेत, तर कर्जत,रोहा, तळा, माणगाव, म्हसळा आणि श्रीवर्धन अशा सहा पंचायत समित्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खिशात आहेत. शेकापकडे १९ जिल्हा परिषद सदस्य आहेत. पंचायत समितींचा विचार केल्यास त्यांचा आकडा हा पाच आहे. त्यामध्ये अलिबाग, पेण, पनवेल, मुरुड आणि सुधागड-पाली या पंचायतींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेकडे १४ सदस्य संख्या आहे, तर पोलादपूर, उरण, महाड आणि खालापूर या चार पंचायतीवर भगवा फडकत आहे. काँग्रेसच्या ताब्यात एकही पंचायत समिती नाही.राजकीय समीकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप मजबूत स्थितीमध्ये आहे. सध्या या दोघांच्या युतीचा झेंडा जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थावर फडकत आहे. दरम्यानच्या काळामध्ये काही सदस्यांनी आपापल्या पक्षावर नाराजी प्रकट करुन विरोधकांच्या गोटात जाणे पसंत केले आहे. परंतु असे असले, तरी कायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या ते निवडून आलेल्या राजकीय पक्षांचेच अविभाज्य घटक आहेत.पनवेल महानगर पालिकेमुळे भाजपाच्या गोटामध्ये कमालीचा आनंद दिसत असला, तरी मतदार संघ जवळजवळ संपुष्टातच आल्याने शेकापच्या गोटामध्ये चिंतेचे वातावरण आहे. तळोजा पाचनंद या मतदार संघातून शेकापचे रामचंद्र करावकर हे सर्वसाधारण आरक्षणातून निवडून आले आहेत. परंतु महानगर पालिकेच्या अस्तित्वाने त्यांच्या मतदार संघाला धक्का लागला आहे. शेकापचे नावडे येथून नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणातून अरविंद पाटील विजयी झाले होते. सध्या ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्याही मतदार संघावर गदा आली आहे. शेकापचे एकनाथ देशेकर (सर्वसाधारण) यांचा शिरवील मतदार संघही इतिहासजमा होणार आहे. शेकापच्याच लक्ष्मी कातकरी (अनु. जमाती) यांनाही गव्हाण मतदार संघावर पाणी सोडावे लागणार आहे. सुमती फटके या वांगणीतर्फे वाजे (सर्वसाधारण महिला) मतदार संघातून विजयी झाल्या होत्या. त्यांचाही मतदार संघ पुनर्रचनेत नामशेष होणार आहे. काळुंद्रे मतदार संघातून (नागरिकांचा मागास प्रवर्ग) राजेंद्र पाटील यांनाही नवीन मतदार संघाचा शोध घ्यावा लागणार आहे.