शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

उघड्या नाल्यातून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 00:06 IST

सीवूड, जुईनगर भागांत एमआयडीसीचे सांडपाणी प्रक्रि या न करताच नाल्यात सोडले जात असल्याने या पाण्याला दुर्गंधी येत आहे.

नवी मुंबई : सीवूड, जुईनगर भागांत एमआयडीसीचे सांडपाणी प्रक्रि या न करताच नाल्यात सोडले जात असल्याने या पाण्याला दुर्गंधी येत आहे. नाल्यांची स्वच्छता केली जात नसल्याने, तसेच बदललेल्या वातावरणामुळे परिसरात डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत असून, ते दुर्गंधीने हैराण झाले आहेत. पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.एमआयडीसीमधील कंपन्यांचे सांडपाणी खाडीकडे वाहून नेण्यासाठी शहरात विविध ठिकाणी नाले बनविण्यात आले आहेत. या सांडपाण्यावर प्रक्रि या न करता, दूषित पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नाल्यांची स्वच्छता झाली नसल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून, नाल्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढली आहेत. तसेच गाळ साचल्याने सांडपाणी साचून राहत आहे. नाल्यात अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यावर विशिष्ट तवंग निर्माण झाला असून, दुर्गंधीबरोबर डासांचे प्रमाणही वाढले आहे. या उघड्या नाल्यामुळे सीवूड, जुईनगर, सानपाडा भागातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, डेंग्यू, मलेरिया अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे. कंपन्यांनी सांडपाण्यावर प्रक्रि या करून नाल्यात सोडणे बंधनकारक असताना, अनेक कंपन्या रसायन मिश्रीत सांडपाणी प्रक्रिया न करताच नाल्यात सोडत आहेत. त्यामुळे पर्यावरणावर आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सदरच्या नाल्यांचे बांधकाम करून बंदिस्त करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. नेरु ळ भागातून सीवूडकडे जाणाºया नाल्याचे काही प्रमाणात बांधकाम करण्यात आलेले आहे; परंतु अर्धवट बांधकाम झालेल्या नाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने याकडे लक्ष द्यावे आणि नाल्याची स्वच्छता करावी, तसेच सांडपाण्यावर प्रक्रि या न करता सांडपाणी थेट नाल्यात सोडणाºया एमआयडीसीतील कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.