शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कच-यामुळे ठाणे-वाशी लोकल घसरण्याची भीती!, महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 06:44 IST

ठाणे-ऐरोलीदरम्यान कळव्यातील ठाणे-वाशी या रेल्वे ट्रॅकवर पसरलेल्या कचºयामुळे या रेल्वेमार्गावरून धावणाºया ठाणे-वाशी अथवा ठाणे-पनवेल लोकल घसरण्याची भीती रेल्वेच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

पंकज रोडेकर / लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे-ऐरोलीदरम्यान कळव्यातील ठाणे-वाशी या रेल्वे ट्रॅकवर पसरलेल्या कचºयामुळे या रेल्वेमार्गावरून धावणाºया ठाणे-वाशी अथवा ठाणे-पनवेल लोकल घसरण्याची भीती रेल्वेच्या सूत्रांनी वर्तवली आहे. जर या मार्गावर लोकल घसरली, तर हा मार्ग पूर्ण ठप्प होऊन प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतील. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वेळीच ट्रॅकवरील आणि त्याच्या आजूबाजूला पसरलेला कचरा हटवण्याची मागणी रेल्वेने केली आहे. पुन:पुन्हा ट्रॅकवर कचरा टाकला जाणार नाही, याची काळजी घेण्याबद्दल पालिकेला बजावले आहे.मध्य रेल्वेच्या जलद मार्गालगत ठाणे-वाशी-पनवेल हा मार्ग आहे. या मार्गावर अप आणि डाउन असे दोनच ट्रॅक आहेत. कळवा-विटावा ब्रिज येथून मध्य रेल्वे आणि ठाणे-वाशी हे मार्ग वेगळे होतात. ठाणे-वाशी मार्ग जेथे वेगळा होतो, तेथे एक वळण आहे. या दोन्ही मार्गांच्या मधोमधच मोठी झोपडपट्टी पसरली आहे. बहुतेक लोक हे परभाषिकआहे. ही झोपडपट्टी एकाच बाजूला असल्याने महापालिका प्रशासनाचे नेहमीच तिकडे दुर्लक्ष होते. तेथे राहणाºया नागरिकांना कचरा टाकण्याची व्यवस्था नसल्याने ते थेट रेल्वे ट्रॅकवर कचरा टाकतात. फेकलेल्या कचºयाचा ढीग हा वळण असलेल्या ट्रॅकच्या आजूबाजूला आहे. जवळपास ३०० ते ४०० मीटर अंतरावर कचºयाचे साम्राज्य पसरल्याचे दिसते. या मार्गावरील लोकल अक्षरश: त्या कचºयातूनच धावते. त्याच झोपडपट्टीतील नागरिक रेल्वे ट्रॅकलगत शौचास जात असल्याने येथून लोकल धावते, तेव्हा प्रवाशांना नाक दाबूनच प्रवास करावा लागतो.बुधवारी दिवा-पारसिक बोगद्यापाशी कल्याणहून तुर्भे येथे जाणाºया मालगाडीचा एक डबा कचरा रेल्वेमार्गात आल्याने घसरला. या घसरलेल्या डब्यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर त्याचा विपरित परिणाम झाला होता. तो मालगाडीचा डबा असल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, कचºयामुळे लोकलचा डबा घसरण्याची पुनरावृत्ती झाल्यास जीवितहानी होऊ शकते.ठाणे-वाशी मार्गावर लोकल घसरून अपघात होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन आता नेमके कसे पाऊल उचलते, याकडे प्रवाशांचे डोळे लागले आहेत. तसेच तेथील नागरिकांनी आम्हाला कचरा टाकण्यासाठी व्यवस्थाच नसल्याने हा कचरा रेल्वे ट्रॅकवर टाकावा लागत आहे. महापालिकेने तशी व्यवस्था करून कचरा वेळेवर उचलावा, अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMumbai Localमुंबई लोकल