शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वाशी खाडी पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनांना बे्रक, वाहतूककोंडीमुळे असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 02:53 IST

वाशी खाडी पुलावर खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढत असून वारंवार वाहतूककोंडी होऊ लागली आहे. सकाळी व सायंकाळी मुंबईकडे जाणाºया मार्गिकेवर पाच मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते पाऊणतास वेळ लागत आहे

नवी मुंबई : वाशी खाडी पुलावर खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढत असून वारंवार वाहतूककोंडी होऊ लागली आहे. सकाळी व सायंकाळी मुंबईकडे जाणाºया मार्गिकेवर पाच मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते पाऊणतास वेळ लागत आहे. नियमित होणाºया कोंडीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार स्वत:ची जबाबदारी झटकत असल्यामुळे खड्डे नक्की बुजवायचे कोणी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले असून, वाशी ते कळंबोलीपर्यंत रोडवर प्रचंड खड्डे पडले आहेत. या समस्येमध्ये आता वाशी खाडी पुलावरील खड्ड्यांचीही भर पडली आहे. मुंबईकडे जाणाºया मार्गिकेवर जवळपास अर्धा फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणातून हजारो वाहने रोज मुंबईकडे येत असतात. याशिवाय पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरातून नोकरी व व्यवसायासाठी चार ते पाच लाख नागरिक महामार्गावरून मुंबईकडे जातात. जुना खाडी पूल धोकादायक असल्याने त्यावरून फक्त मोटारसायकल व हलकी वाहने अपवाद स्थितीमध्ये जात असतात. पूर्ण वाहतूक नवीन खाडी पुलावरून जात असते. सद्यस्थितीमध्ये पुलावरील खड्ड्यांमुळे रोज सकाळी ७ ते दुपारी ११ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. दुपारी व काही वेळेला सायंकाळीही अनेक वेळा वाहतूक धिम्या गतीने सुरू असते.खाडी पुलावरील वाहतूककोंडी अनेक वेळेला वाशी गाव ते वाशी प्लाझापर्यंत येऊ लागली आहे. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सकाळी व सायंकाळी जादा बंदोबस्त ठेवावा लागत आहे. पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला आहे. टोल कंपनीकडेही याविषयी पाठपुरावा केला आहे; पण दोन्हीकडून खड्डे बुजविण्यासाठी एकमेकांवर जबाबदारी झटकली जात आहे. यामुळे खड्डे बुजविण्यासाठी नक्की कोणाकडे व कसा पाठपुरावा करायचा, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Potholeखड्डे