शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

घणसोलीत मलेरियामुळे महिलेचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 02:29 IST

मुसळधार पावसाच्या बदलत्या हवामानामुळे नवी मुंबईत संशयित डेंग्यू, मलेरिया आणि हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

नवी मुंबई : मुसळधार पावसाच्या बदलत्या हवामानामुळे नवी मुंबईत संशयित डेंग्यू, मलेरिया आणि हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. उपचारासाठी नवी मुंबईतील महापालिका आणि खासगी रुग्णालयात रु ग्णांनी एकच गर्दी केली आहे. दोन दिवसांपासून हिवतापाने हैराण झालेल्या घणसोली गावातील सीमा शंकर पाटील (३३) या महिलेचा बुधवारी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ऐरोली येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.घणसोली गावात चिंचआळी येथे राहणाऱ्या सीमा पाटील गेल्या दोन दिवसांपासून हिवतापाने आजारी होत्या, म्हणून त्यांना मंगळवारी १७ रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास उपचारासाठी ऐरोली सेक्टर ८ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, त्यांच्यावर डॉ. संदीप मुळे उपचार करीत होते. मात्र त्यांना आज पहाटेच्या वेळेस अचानक ताप भरून शरीरातील रक्तपेशींचे प्रमाण घटल्याने श्वासोच्छ्वासाचा त्रास सुरू झाल्यामुळे सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक धनोज गपाट यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. या प्रकारानंतर महापालिकेच्या घणसोली येथील नागरी आरोग्य केंद्रामार्फत वेळच्यावेळी धूर फवारणी, तसेच अळीनाशक फवारणी होत नसल्याबद्दल घणसोली गावातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होवू लागली आहे. डेंग्यू व मलेरियाचे रुग्णही आढळू लागले आहेत. महानगरपालिकेने औषध फवारणी सुरू केली असून नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :dengueडेंग्यू