शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अवाढव्य भाडेदरामुळे व्यावसायिक गाळे ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:38 IST

प्रशासन उदासीन; लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष; महापालिकेचे नुकसान

- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी मार्केट बांधण्यात आले असून मार्केटमधील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. या गाळ्यांना रेडिरेकनरनुसार भाडे आकारले जाते. परंतु नागरिकांची वर्दळ नसलेल्या ठिकाणी रेडिरेकनरच्या दरानुसार लावण्यात आलेले भाडे जास्त असल्याने त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसून गेल्या अनेक वर्षांपासून गाळे बंद अवस्थेत आहेत. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रशासन उदासीन आहे तसेच लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाले आहे.नवी मुंबई शहरातील नागरिकांना सुविधा देण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विधिध ठिकाणी मार्केट बांधण्यात आले आहेत. जागेचे ठिकाण, क्षेत्रफळ यानुसार शासनाने निर्देशित केलेल्या दरांप्रमाणे मार्केटमधील गाळ्यांना भाडे आकारले जाते. हे भाडे जागेच्या मूल्याच्या वार्षिक आठ टक्केप्रमाणे घेतले जाते.शिरवणे भूखंड क्र मांक ७६१ ते ७६४ वर बांधण्यात आलेल्या मार्केटमधील सुमारे ८ गाळे बंद आहेत. श्रमिकनगर खैराणे येथील ३ आणि करावेमधील भूखंड क्र मांक १६० वर बांधण्यात आलेल्या गाळ्यांमधील १ गाळा असे सुमारे २४ गाळे गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेमध्ये आहेत.१२ गाळे पाच वर्षांपासून बंदचनागरिकांची वर्दळ आणि रहदारी कमी असलेल्या ठिकाणी तसेच काही ठिकाणी गाळे बांधण्यात आले आहेत तर काही ठिकाणी गाळ्यांचे क्षेत्रफळ कमी असून रेडिरेकनरनुसार भाड्याचे दर जास्त आहेत. त्यामुळे या गाळ्यांना प्रतिसाद मिळत नाही.सीबीडी येथील महापालिकेच्या स्वर्गीय राजीव गांधी क्रीडा संकुलाच्या बाहेर गाळे बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी नागरिकांची वर्दळ कमी असल्याने तसेच भाड्याचे दर जास्त असल्याने यामधील सुमारे १२ गाळे गेल्या पाच वर्षांपासून बंद आहेत.निविदांना प्रतिसाद नाहीसदर गाळे भाड्याने देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात आॅनलाइन आणि आॅफलाइन पद्धतीने निविदा मागविण्यात आल्या आहेत. परंतु या निविदांना नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून नुकसान टाळण्यासाठी ठोस निर्णय घेण्यास प्रशासन उदासीन असून लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाले आहे.