शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कचराप्रकरणी हॉटेलचालकांना १ डिसेंबरची मुदत, पनवेल आयुक्तांनी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 04:48 IST

पनवेल महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाबाबत ठोस पाऊल उचलले आहे. महापालिका आयुक्तांनी सोमवारी हॉटेलचालकांची बैठक बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. आपला कचरा आपणच विल्हेवाट लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

कळंबोली : पनवेल महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाबाबत ठोस पाऊल उचलले आहे. महापालिका आयुक्तांनी सोमवारी हॉटेलचालकांची बैठक बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. आपला कचरा आपणच विल्हेवाट लावण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. त्याचबरोबर याकरिता नेमक्या काय उपाययोजना करता येतील याबाबत माहिती देण्यात आली. १ डिसेंबरनंतर महापालिका आणि सिडको हॉटेलचा ओला कचरा उचलणार नसल्याचा इशारा यावेळी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिला.पनवेल महानगरपालिका हद्दीतील दररोज चारशे ते साडेचारशे टन कचरा निर्माण होतो. त्यांची विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चाळ येथील क्षेपणभूमी वादग्रस्त ठरली आहे. या ठिकाणी कचरा टाकण्यास स्थानिक ग्रामस्थ मनाई करीत आहेत. वहाळ येथे कचरा टाकण्यास विरोध होत आहे. त्याचबरोबर सिडको महापालिकेकडे ही सेवा वर्ग करून देण्याकरिता देव पाण्यात बुडून आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रशासनाने पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे. हॉटेल आणि मॉलमधून मोठ्या प्रमाणात ओला कचरा निर्माण होतो. महापालिकेने घेतलेल्या अंदाजानुसार हॉटेलमध्ये दररोज शंभर ते दीडशे किलो ओला कचरा तयार होतो. हा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याकरिता आरोग्य विभागाला घाम गाळावा लागतो तसेच कसरत करावी लागते. घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार हॉटेलचालक आणि मॉलवाल्यांनी आपल्या कचºयाची विल्हेवाट स्वत: लावणे क्र मप्राप्त आहे. त्यानुसार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील हॉटेल मालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मनपा आयुक्तांनी सोमवारी या संदर्भात बैठक बोलावली होती. संबंधितांना नियमावलीबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर पुढील आठवड्यात कचरा वर्गीकरण, बायोगॅस, कंपोस्ट खत निर्मिती करणारे प्रात्यक्षिकही दाखवण्यात येणार आहे.महिला कचरावेचकाचा आधारशहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहरातील कचरावेचक महिलांचा महत्त्वाचा सहभाग आहे. संबंधित महिला कचरापेट्यातील प्लास्टीक, थर्माकोल यासारख्या पुनर्प्रक्रिया होवू शकणाºया वस्तू कचºयातून वेगळ्या करतात.पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर येथील ३९० हॉटेल, मॉलमधील कचरा वर्गीकरण करण्यास महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या कचरावेचक महिलांचा आधार घेता येणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई