नवी मुंबई : घराच्या हरवलेल्या चाव्यांच्या आधारावर पोलिसांना नेरूळमधील घरफोडीची अवघ्या 12 तासांत उकल केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 66 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पामबीच मार्गालगत असलेल्या सी ब्रिज या टॉवरमधील दीपा चौहान यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 66 लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. चौहान तीन दिवसांसाठी घराबाहेर गेल्या असता घरफोडी झाली होती. शनिवारी रात्री यासंदर्भात गुन्हा दाखल होताच अवघ्या 12 तासांच्या आत पोलिसांनी सोहेब ऊर्फ देवेंद्र सुतार (28) आणि अनिल नागरी या दोघांना अटक केली. देवेंद्र हा पूर्वी चौहान यांच्याकडे कार चालकाची नोकरी करायचा तर अनिल हा त्यांच्या इमारतीचा सुरक्षा रक्षक आहे. देवेंद्रने घरफोडीचा कट रचला.
देवेंद्र याने घरातील सीसीटीव्ही कॅमे:यांची दिशा बदलून वायरही कापली होती. शिवाय घराच्या चाव्यांच्या दोन संचापैकी एक संच चोरला होता. मात्र काही दिवसांतच त्याला नोकरीवरून काढण्यात आले होते. परंतु नोकरीवरून निघण्यापूर्वी देवेंद्रने इमारतीचा सुरक्षा रक्षक अनिल नागरी याला कटात सहभागी केले होते. त्यानुसार घरफोडी करण्यासाठी काही दिवसांसाठी घर बंद होण्याची वाट ते पाहत होते. अखेर 7 नोव्हेंबरला दीपा चौहान या तीन दिवसांसाठी मुंबईत नातेवाइकांकडे गेल्या होत्या. हीच संधी साधत 8 नोव्हेंबरला सकाळी त्यांनी घरफोडी केली. चोरलेल्या चाव्यांच्या आधारे आत प्रवेश केला, तर अनिल याने इमारतीच्या तळमजल्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते. पोलिसांनी घरातील सीसीटीव्ही तपासले असता देवेंद्र हा कॅमे:याची दिशा बदलताना दिसला. त्यानुसार जोगेश्वरी येथून त्याला पकडण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्हय़ाची कबुली दिली. त्यानुसार या दोघांनाही अटक केल्याचे परिमंडळ 1 चे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. घरझडतीमध्ये 55 लाख 5क् हजारांचा ऐवज मिळाला. यामध्ये गुन्हे शाखेने फिंगर प्रिंट घेऊन श्वान पथकाने आरोपींचा शोध घेतला.नेरूळ पोलिसांच्या पथकाला 15 हजारांचा पुरस्कार देण्यात आला. (प्रतिनिधी)
निष्काळजीपणा नडला
दीपा चौहान या आपल्या मुलासह सदर इमारतीमध्ये राहतात. घरामध्ये सुरक्षेसाठी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून त्याची वायरही तुटल्याचे त्यांना समजले होते. तर चाव्यांच्या दोनपैकी एक संच हरवल्याचेही त्यांना माहीत होते. यावरून त्यांना घडणा:या गुन्हय़ाचे संकेत मिळत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यांचा हाच निष्काळजीपणा घरफोडीला कारणीभूत ठरला.
सीसीटीव्हीचा डीव्हीआर
ठरला महत्त्वाचा
घरफोडी करताना सीसीटीव्हीचा डीव्हीआर (सव्र्हर) देखील चोरण्याचा देवेंद्रचा बेत होता. त्यासाठी त्याने कॅमे:याची वायर कापली होती. परंतु घराच्या कोणत्या भागात हा डीव्हीआर आहे याची माहिती देवेंद्रला कळलेली नव्हती. त्यामुळेच सीसीटीव्हीची दिशा बदलताना कैद झालेले चित्रीकरण तपासाचा मार्ग ठरले.