शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या दुरवस्थेमुळे महापालिकेची नाचक्की; मुख्यमंत्र्यांकडे केली सायन-पनवेल रस्त्याच्या हस्तांतरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:59 IST

राहण्यास योग्य शहरात नवी मुंबईचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. असे असले तरी सायन-पनवेल महामार्गाच्या दुरवस्थेमुळे महापालिकेची नाचक्की होत आहे. खड्डेमय महामार्गामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकास बाधा निर्माण होत आहे.

नवी मुंबई : राहण्यास योग्य शहरात नवी मुंबईचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. असे असले तरी सायन-पनवेल महामार्गाच्या दुरवस्थेमुळे महापालिकेची नाचक्की होत आहे. खड्डेमय महामार्गामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकास बाधा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील ९ किमी लांबीचा रस्ता हस्तांतरित करावा,यासाठी महापौर जयवंत सुतार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आता साकडे घातले आहे.मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या नवी मुंबई शहराला जागतिक दर्जा प्राप्त होवू लागला आहे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेचा सन्मान झाला आहे. तसेच राहण्यासाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबईचा गौरव झाला आहे. चोवीस तास पाणी, मलनि:सारणाची तंत्रशुध्द प्रणाली, मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे नियोजनबध्द जाळे, उद्याने, शैक्षणिक सुविधा, नोकरीच्या उत्तम संधी आदीमुळे शहराला वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. मुंबईत जाण्यासाठी सायन-पनवेल महामार्गाचा अवलंब केला जातो. परंतु महामार्गावरील खड्ड्यांमुळे बाहेरून येणारे नागरिक महापालिकेच्या कार्यक्षमतेवर शंका व्यक्त करीत आहेत. ही बाब महापौर जयवंत सुतार यांनी रविवारी वाशी येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आखात्यारित आहे. त्यामुळे महापालिकेला त्याची डागडुजी करता येत नाही. वाशी ते बेलापूरपर्यंतचा ९ किमी लांबीचा महमाार्गाचा भाग हस्तांतरित केल्यास त्याची नियोेजबध्द निगा राखणे शक्य होईल, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, शहरातील नागरी प्रश्नांसाठी लढणाºया नवी मुंबई फर्स्ट चॅरिटेबल ट्रस्ट या संघटनेने वाशी ते बेलापूरपर्यंतचा ९ किमी लांबीचा महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित व्हावा, यासाठी मोहीम छेडली आहे. याचाच एक भाग म्हणून या संस्थेच्या एका शिष्टमंडळाने अलीकडेच महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेवून यासंदर्भात चर्चा केली होती. इतकेच नव्हे, तर येत्या काळात ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई