शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वाशीतील वाहनतळ पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:34 IST

वाहनधारकांनी फिरविली पाठ; पैसे वाचविण्यासाठी रोडवर बेकायदेशीर पार्किंग

नवी मुंबई : वाशी सेक्टर १६ ए मधील नाल्यावर महापालिकेने वाहने पार्किंगसाठी प्रशस्त जागा बनविली आहे. या ठिकाणी वाहने पार्किंगचे शुल्क आकारले जात असल्याने पैसे वाचविण्यासाठी नागरिक समोरच असलेल्या सेक्टर १७ मधील इमारतींच्या बाहेर बेकायदेशीरपणे वाहने उभी करीत आहेत, त्यामुळे या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.नवी मुंबईत महापालिकेच्या वतीने शहरातील पार्किंगची गैरसोय थांबविण्यासाठी नागरिक आणि वाहनांची जास्त वर्दळ असणाऱ्या भागात वाहने पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाशीमधील सेक्टर १७ परिसरात विविध कार्यालये, दुकाने, शोरूम, शाळा, कॉलेज, रेल्वेस्थानक, वाशी बस डेपो, सायन-पनवेल महामार्ग, विविध मॉल, हॉटेलदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे कामानिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. नागरिकांची वर्दळ लक्षात घेता रेल्वेस्थानक, विविध रस्त्याच्या कडेला पालिकेच्या वतीने पे अ‍ॅण्ड पार्क सुरू करण्यात आले होते. या जागा अपुºया पडत असल्याने वाशी सेक्टर १६ ए मधील मोठा पावसाळी नाला बंदिस्त करून सुमारे १५० हून अधिक चारचाकी वाहने पार्किंगची क्षमता असलेले वाहनतळ उभारण्यात आले आहे. यामध्ये दुचाकी वाहनांसाठी देखील भव्य जागा राखून ठेवण्यात आली असून, पार्किंग करण्यात येणाºया चारचाकी वाहनांसाठी प्रतितास १० रु पये आणि दुचाकी वाहनांसाठी पाच तासांचे १० रु पये शुल्क आकारण्यात येत आहे; परंतु पार्किंगचे पैसे वाचविण्यासाठी नागरिक सेक्टर १७ मधील इमारतींच्या बाहेरील रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग करीत आहेत. वाहने पार्किंग करण्यासाठी या ठिकाणी जागा मिळत नसल्याने अनेक वेळा एकामागे एक वाहने पार्किंग केली जात असून, दुचाकी वाहने पदपथावर पार्किंग केली जात आहेत. कार्यालयांच्या आणि सोसायट्यांच्या गेटवर देखील वाहने उभी केली जात असल्याने सोसायटीच्या आवारात वाहने ने-आण करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी वाहने आणि नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत असून, नागरिकांना पदपथावरून चालणेदेखील जिकिरीचे झाले आहे. रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर अतिरिक्त पार्किंग होणाºया ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते; परंतु पार्किंगचे पैसे वाचविण्यासाठी वाहनचालकांमुळे इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Parkingपार्किंगrailwayरेल्वे