शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीची छेड काढणाºयाला कोठडी, मानसिक संतुलन बिघडल्याने केले कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 02:32 IST

तुर्भे रेल्वेस्थानकात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केलेला नरेश जोशी (४२) याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. गुरुवारी सकाळी त्याने फलाटावर रेल्वेच्या प्रतीक्षेत थांबलेल्या तरुणीचा विनयभंग केला होता. दरम्यान, नरेशवर मानसिक आजाराचे उपचार सुरू असल्याचा दावा त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे केला आहे.

नवी मुंबई : तुर्भे रेल्वेस्थानकात तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केलेला नरेश जोशी (४२) याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. गुरुवारी सकाळी त्याने फलाटावर रेल्वेच्या प्रतीक्षेत थांबलेल्या तरुणीचा विनयभंग केला होता. दरम्यान, नरेशवर मानसिक आजाराचे उपचार सुरू असल्याचा दावा त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे केला आहे. ठाण्याकडे जाणाºया रेल्वेची वाट पाहत थांबलेल्या तरुणीला जबरदस्ती मिठी मारून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी घडला होता. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये पाहताच, आरपीएफच्या दोघा जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. वाशी रेल्वे पोलिसांनी जोशी याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. या वेळी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.नरेश जोशी हा आई, वडील, पत्नी व दोन मुलांसह घणसोली येथे भाड्याने राहतो. या प्रकारानंतर तो मानसिक आजाराने त्रस्त असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी वाशी रेल्वे पोलिसांकडे केला आहे. त्याच्यावर औषधोपचार सुरू असून, काही दिवसांपासून त्याने औषध घ्यायचे थांबवले होते. यामुळे मानसिक संतुलन बिघडून त्याने हे कृत्य केल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा