शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमधून सव्वा कोटीचे अमली पदार्थ जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 1, 2023 13:23 IST

थर्टी फर्स्टच्या अनुशंघाने सुरु होती विक्री.

नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी खारघर येथून सव्वा कोटीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये १६ नायजेरियन व्यक्ती आहेत. त्यांच्याकडून ८३ लाखाचे हेरॉईन तर २९ लाखाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. 

थर्टी फर्स्टच्या अनुशंघाने नवी मुंबई पोलिसांकडून शहरातील गैर हालचालींवर चोख नजर ठेवली जात आहे. यादरम्यान खारघर येथील एका रो हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे यांनी गुन्हे शाखेचे एकत्रित पथक तयार केले होते. या पथकाने शुक्रवारी खारघर सेक्टर १२ येथील सी ४९ या रो हाऊसवर नियोजनबद्ध छापा टाकला. त्यावेळी रो हाऊसच्या तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर जमलेल्या नायजेरियन व्यक्तींनी पोलिसांना धक्काबुकी करून पळून जाण्याचाही प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी देखील बळाचा वापर करून १७ जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये १६ नायजेरियन व्यक्ती असून ६ महिला आहेत. त्यांच्याकडून १ कोटी १३ लाखाचे अमली पदार्थ जप्त केल्याचे उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले. त्यामध्ये २९ लाखाचा गांजा तर ८३ लाखाचे हेरॉईन आहे. 

अटक केलेल्या नायजेरियन व्यक्तींमार्फत हे ड्रग्स थर्टी फर्स्टच्या अनुशंघाने शहरात ठिकठिकाणी पुरवले जाणार होते. तत्पूर्वीच गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांचा डाव उधळून लावला. या कारवाईमुळे ड्रग्स रॅकेट मधील मोठे मासे देखील पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विरोधी कारवायांचा धडाका सुरु आहे. त्यावरून आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पदभार घेताच पोलीस ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई