शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

दुष्काळातही पाण्याची उधळपट्टी सुरू

By admin | Updated: September 24, 2015 00:23 IST

गतवर्षीच्या तुलनेमध्ये पाऊस कमी पडल्यामुळे राज्यभर दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र पाणी वाचवा मोहीम सुरू असताना नवी मुंबई व पनवेल परिसरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे.

प्राची सोनवणे,नवी मुंबईगतवर्षीच्या तुलनेमध्ये पाऊस कमी पडल्यामुळे राज्यभर दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र पाणी वाचवा मोहीम सुरू असताना नवी मुंबई व पनवेल परिसरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. पाणी गळती, चोरी व पिण्याच्या पाण्याचा वाहने धुणे व उद्यानासाठीही वापर केला जात आहे. नवी मुंबईकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी महापालिकेने मोरबे धरण विकत घेतले आहे. यामुळे शहरवासीयांना २४ तास पाणी पुरविणे शक्य झाले आहे. २०१२ च्या भीषण दुष्काळात राज्यातील सर्व शहरांमध्ये पाणीकपात सुरू असताना नवी मुंबईमध्ये मात्र मुबलक पाणीपुरवठा करण्यात येत होता. सद्यस्थितीमध्ये ३६० एमएलडी पाणी धरणातून घेतले जात आहे. सद्यस्थितीमध्ये पाणी साठा समाधानकारक असला तरी गतवर्षी २२ सप्टेंबरला मोरबे परिसरात तब्बल २०३५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी फक्त १५५० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा तब्बल ४८५मिलीमिटर पाऊस कमी आहे. सद्यस्थितीमध्ये धरणातील पाणीसाठा मार्चपर्यंतच पुरू शकतो. यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. मात्र शहरवासी पाण्याची प्रचंड उधळपट्टी करत आहेत. अनेक सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्या ओसांडून वाहत असतात. पाइपलाइनने वाहने व झाडांना पाणी घातले जात आहे. पाण्याच्या उधळपट्टीविषयी दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. महापालिका क्षेत्रात १९ टक्के पाणीगळती आहे. यामध्ये पाणी चोरीचाही समावेश आहे. काही हॉटेल व इतर व्यावसायिक चोरून पाणी वापर असल्याचे बोलले जात आहे. पाण्याचा होणारा गैरवापर, पाणीचोरी, या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने कडक भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. पाण्याची उधळपट्टी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पथक तयार केले आहे. आतापर्यंत ४ हजारपेक्षा जास्त नागरिकांना नोटीस पाठविल्या आहेत.