शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वाहन परवान्यासाठी चालक ‘ऑनलाइन’ पास; उमेदवारांची परीक्षा देणारे रॅकेट

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 31, 2022 05:47 IST

नियमांबाबत अज्ञानीही बनले वाहन चालक. वाहनचालकांच्या सोयीसाठी आरटीओची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. परंतु, दलालांमार्फत त्याचा उपयोग अपात्र उमेदवारांना पास करून नफा कमवण्यासाठी होत असल्याचे उघड झाले आहे.

- सूर्यकांत वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पक्का वाहनचालक परवाना काढण्यापूर्वी शिकाऊ चालक परवाना काढण्यासाठी द्यावी लागणारी चाचणी देणारे रॅकेट उघडकीस आले आहे. आरटीओ आवारात एजंटमार्फत चालणाऱ्या या रॅकेटने शेकडो वाहनचालकांची सराव परीक्षा देऊन त्यांना पास केल्याची शक्यता आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला असून, अनेकांना नोटीस बजावली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी शनिवारी दिली. 

वाहनचालकांच्या सोयीसाठी आरटीओची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. परंतु, दलालांमार्फत त्याचा उपयोग अपात्र उमेदवारांना पास करून नफा कमवण्यासाठी होत असल्याचे उघड झाले आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पडताळणीत हा प्रकार उघड झाला असून, याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिकाऊ वाहनचालक परवाना प्रक्रिया पारदर्शक राबवली जात नसल्याचा संशय परिवहन विभागाला आला होता. त्यानुसार सर्व आरटीओ कार्यालयांना पडताळणीचे सूचित केले होते. त्याद्वारे नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी सहायक निरीक्षक तुषार कदम यांच्यामार्फत सापळा रचला होता.

त्यामध्ये कदम यांनी दलाल कुलदीप सिंग याच्याकडे जाऊन त्यांच्या सांगलीतल्या मित्राचे आधार कार्ड देऊन त्याचा शिकाऊ वाहन चालक परवाना बनवायचा असल्याचे सांगितले. त्यानुसार सिंग याने १५०० रुपये घेऊन त्या आधारकार्डद्वारे ऑनलाइन नोंदणी करून उमेदवाराने द्यायची असलेली चाचणीदेखील स्वतः देऊन प्रत्यक्षात उपस्थित नसलेल्या उमेदवाराला पास केले. त्यानंतर अशाच प्रकारे परिसरातील इतरही दलाल नव्याने वाहनचालक परवाना काढत असलेल्या व्यक्तीची सराव परीक्षा उत्तीर्ण करून देत असल्याचे उघड झाले. त्यानुसार २२ जुलैला सिंग विरोधात गुन्हा दाखल करून एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक माणिक नलावडे यांच्या पथकाने गुप्तरित्या इतरही दलालांकडे अशाच प्रकारे बोगस ग्राहक पाठवले. त्यात बहुतांश दलाल घरबसल्या उमेदवारांना पास करून देत असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांमार्फत या सर्वांना नोटिसा बजावल्या आहेत.

दलालच करत होते पास    वाहनचालक परवाना काढण्यापूर्वी शिकाऊ परवाना काढलेला लागतो. त्यासाठी ऑनलाइन परीक्षा देऊन पास होण्यासाठी ६० गुण मिळवावे लागतात. त्यामध्ये वाहतुकीच्या नियमांशी संबंधित प्रश्न असतात. परंतु, अनेकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत अज्ञान असल्याने त्यांना नापास होण्याची भीती असते. त्यामुळे हे दलाल स्वत: लॉगिन करून चाचणी देऊन अर्जदारांना पास करत होते. 

अतिहुशारी आली अंगलटवर्षानुवर्षे काम करणाऱ्या दलालांना चाचणीचे प्रश्न व त्यांची उत्तरे पाठ झालेली आहेत. यामुळे अवघ्या अर्ध्या ते एक मिनिटात ते उमेदवाराची परीक्षा द्यायचे.इतक्या कमी वेळात चाचणी पूर्ण कशी होतेय? अशी शंका परिवहन विभागाला आल्याने चौकशीचे आदेश दिले होते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस