शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पाली नगरपंचायतीचे स्वप्न भंगले

By admin | Updated: March 22, 2016 02:28 IST

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २६ जून २०१५ ला अधिसूचना काढून रायगड जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ६ ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये केले

विनोद भोईर,  पालीराज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २६ जून २०१५ ला अधिसूचना काढून रायगड जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ६ ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये केले. यापैकी ५ ग्रामपंचायतींत नुकतेच निवडणुका घेवून नगरपंचायती होण्याच्या निर्णयास काही ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध दर्शविला होता व त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने गेल्या ६ महिन्यांपासून नगरपंचायतीचे घोंगडे भिजत पडले होते. अखेर पाली नगरपंचायत स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केला. त्यामुळे पालीकरांचे नगरपंचायतीचे स्वप्न भंगले असून पालीकरांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. या सर्व जुन्या खेळाडूंपुढे पाली ग्रामपंचायतीचा कारभार चालवित असताना नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याचे मोठे आव्हान आहे. पाली शहराचे झपाट्याने होत असलेले नागरीकरण पाहता येथील नागरिकांना अनेक समस्यांनी ग्रासले आहे. यामध्ये ग्रामपंचायतीच्या मालकीचे असलेले सरकारी भूचरणातील अतिक्रमण, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाली शहरात झालेली अनधिकृत बांधकामे, वाहतूककोंडी, दूषित पाणी, घाणीचे साम्राज्य, डंपिंग ग्राऊंड आदि जटील समस्यांचे निराकरण पाली नगरपंचायत झाली असती तर करता आले असते. कारण की यासाठी नगरविकास खात्याकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. तसेच नगरपंचायतीचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालत असल्याने त्यांचे अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, स्वच्छता आदी बाबींवर कटाक्षाने लक्ष राहते. या उलट पाली ग्रामपंचायत झाल्याने पालीतील नागरिकांना पुन्हा या सर्व समस्यांना सामना करावा लागणार आहे. ग्रामपंचायतीने केलेली कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत, हे पालीकरांनी गेली कित्येक वर्षांपासून अनुभवलेले आहे. या सर्वांतून पालीकरांची सुटका करावयाची असेल तर पाली नगरपंचायत करावी लागेल असे येथील ग्रामस्थांचे मत आहे. या सदस्यांचा ग्रामपंचायतीचा उरलेला दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर तरी पाली नगरपंचायत व्हावी यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेवू असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.