लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : लोकसभा असो की विधानसभा, महापालिका किंवा ग्रामपंचायत... या निवडणुका झाल्या, की मतदानानंतर आई-वडील, भावा-बहिणीच्या बोटाची शाई पाहून हेवा वाटायचा. मतदार म्हणून आपल्याही बोटाला शाई लागण्याचे पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले... ही भावना होती, पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची. लोकशाही प्रक्रियेतील नवमतदारांची. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पहिल्यांदा रांग लावून मतदान केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहात होता. लगेचच त्यातील काहींनी सेल्फी काढत तो आनंद सोशळ मीडियीवर शेअरही केला. मात्र, पहिल्यांदा मिळालेला मतदानाचा हक्क बजावल्याचे या मतदारांनी ‘लोकमत’ला सांगितले.सिद्धांत जाधव, प्रशांत गायकवाड अनिकेत निकम यांनी आॅनलाईन यादीत नाव पहिले होते. मात्र, घरी मतदानाची स्लिप न मिळाल्याने त्यांचा गोंधळ उडाला होता. मतदानाच्या दिवशी आॅनलाईनवर मिळालेल्या माहितीनुसार आम्ही मतदानकेंद्गावर गेलो. तेथील यादीत नाव पाहून मतदान केले. पहिल्यांदाच मतदान केल्यााच अनुभव रोमांचकारी होता. त्यातच मतदानयंत्रावर मतदान करताना गोंधळ उडाला. पण, लोकशाहीत मिळालेला हक्क बजावल्याचे त्यांनी सांगितले. कृत्तिका निकम हिनेही पहिल्यांदाच मतदान केले. हा हक्क बजावण्यापूर्वी तिला वडिलांनी कसे मतदान करावे, याबाबत माहिती दिली होती. मतदार म्हणून शाई लागण्याचे स्वप्न अखेर आज पूर्ण झाले. त्यामुळे मी आनंदी आहे, अशी भावना तिने व्यक्त केली.डोली म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते नवरी किंवा एखादी यात्रा. परंतु भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानकेंद्रावर वयोवृद्ध मतदारराजासाठी चक्क डोली सेवा उपलब्ध करून दिली गेल्याचे पाहायला मिळाले. रिक्षा, व्हिलचेअरवर येणार मतदार आजवर पाहिले गेले होते; पण यंदा प्रथमच डोली सेवा पाहायला मिळाली. ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. मतदानाच्या दिवशी मतदार हा राजा असतो. त्यातही वृद्ध, आजारी मतदारांना केंद्रावर आणण्यासाठी नामी शक्कल लढवल्या जातात. कामतघर येथील रंगराव पवार विद्यालयात खास करून डोली सेवा उपलब्ध करून देण्यात आली. एका खुर्चीला चार बांबू बांधून ही डोली तयार करण्यात आली होती.
बोटाला शाई लागल्याचे स्वप्न पूर्ण झाले...!
By admin | Updated: May 25, 2017 00:09 IST